Stocks to buy today : दिवाळीच्या दुसऱ्या दिवसाच्या शुभ मुहूर्तावर तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी काही शेअर सुचवले आहेत. यात वेगवेगळ्या क्षेत्रातील एकूण ८ कंपन्यांचा समावेश आहे.
‘प्रभुदास लिलाधर’च्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी ३ शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगरिया यांनी दोन स्टॉक निवडीची शिफारस केली आहे. तर, आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी आजच्या तीन स्टॉक आयडिया सुचविल्या आहेत. कोणते आहेत हे स्टॉक्स आणि कोणत्या पातळीवर खरेदी केल्यास फायदेशीर ठरू शकतात, पाहूया…
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड: १४४ रुपयांना खरेदी करा. १५५ रुपयांचे लक्ष्य ठेवा आणि १४०.२ रुपयांवर स्टॉपलॉस ठेवायला विसरू नका.
कोल इंडिया लिमिटेड : कोल इंडियावर ४८० रुपयांच्या टार्गेटसाठी ४३५.३ रुपये स्टॉपलॉससह ४४५ रुपयांना खरेदीची शिफारस केली आहे.
जीएमआर एअरपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड : वैशाली पारेख ७९ रुपयांना खरेदी करण्याची शिफारस करतात. ८५ रुपये उद्दिष्ट ठेवण्यात आले असून स्टॉपलॉस ७६ रुपये निश्चित करण्यास सांगण्यात आले आहे.
डायनॅमिक केबल्स लिमिटेड : बागरिया यांनी डायनॅमिक केबल्स ७९० रुपयांच्या स्टॉप लॉससह ८७५ रुपयांच्या टार्गेटवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
अनुप इंजिनीअरिंग लिमिटेड : बगडिया यांनी अनुप इंजिनीअरिंगवर १४८.८५ रुपयांना खरेदी केली असून ३३५० रुपयांच्या टार्गेटसाठी ३०३० रुपये स्टॉपलॉस आहे.
आरबीएल बँक लिमिटेड : गणेश डोंगरे यांनी आरबीएल बँकेवर १८० रुपयांच्या टार्गेटसाठी १६८ रुपये स्टॉपलॉस सह १७३ रुपयांना खरेदीची शिफारस केली आहे.
एम्क्युअर फार्मास्युटिकल्स लिमिटेड : १४५० रुपयांच्या टार्गेटसाठी १३७५ रुपयांवर स्टॉपलॉस ठेवून हा शेअर १४०८ रुपयांना खरेदी करा.
सन टीव्ही नेटवर्क लिमिटेड : सन टीव्ही नेटवर्क लिमिटेड ७४२ रुपयांपर्यंत खरेदी करून ७३० रुपये स्टॉपलॉस लावावा.
संबंधित बातम्या