Stocks To buy today : दिवाळी सणानंतरचा शेअर बाजाराचे आज पहिलेच ट्रेडिंग सत्र असून हा आठवड्याचा पहिला दिवस आहे. या दिवशी कोणते शेअर खरेदी करणं जास्त फायद्याचं असेल याबाबत काही तज्ज्ञांनी आपापली मतं मांडली आहेत. जाणून घेऊया…
प्रभुदास लिलाधरच्या टेक्निकल रिसर्चच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आजच्या तीन शेअर्सची शिफारस केली आहे. यामध्ये रामको सिमेंट लिमिटेड, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी) आणि केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड यांचा समावेश आहे.
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बागरिया यांनी दोन शेअर्सची शिफारस केली आहे. आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनीही तीन शेअर्सची नावं सांगितली आहेत.
झोमॅटो लिमिटेड : झोमॅटोचा शेअर २४८.९९ रुपयांना खरेदी करण्याचा सल्ला बागरिया यांनी दिला आहे. २६५ रुपयांच्या टार्गेट प्राइससह २४० रुपयांवर स्टॉपलॉस ठेवायला विसरू नका.
यूटीआय अॅसेट मॅनेजमेंट कंपनी : यूटीआय एएमसी १३६०.४० रुपयांना खरेदी करा, १४४४ रुपयांच्या टार्गेटसह स्टॉप लॉस १३२२ रुपये ठेवा.
ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड : ग्रासिम इंडस्ट्रीज २७०२ रुपयांना खरेदी करा आणि २८५० रुपयांच्या टार्गेटसह २६५० रुपयांवर स्टॉपलॉस ठेवा.
एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड : एलआयसी हाऊसिंग फायनान्सचा शेअर ६६० रुपयांच्या टार्गेट प्राइससह ६३२ रुपयांना खरेदी करता येईल. त्यासाठी ६०५ रुपये स्टॉपलॉस लावावा.
आयटीसी लिमिटेड : आयटीसी लिमिटेड ४८९ रुपयांना खरेदी करावा. ५०३ रुपयांचं लक्ष्य ठेवून ४८० रुपयांवर स्टॉपलॉस ठेवावा.
रामको सिमेंट्स लिमिटेड : हा शेअर ८९१ रुपयांपर्यंत खरेदी करावा. लक्ष्य किंमत ९०८ ठेवून ८८०.२० रुपयांवर स्टॉप लॉस ठेवण्यास विसरू नका.
ओएनजीसी : २८३ रुपयांचं टार्गेट ठेवून ओएनजीसी २७० रुपयांना खरेदी करा आणि २६३.२ वर स्टॉपलॉस ठेवायला विसरू नका.
केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड : ८४० रुपयांच्या टार्गेटसह हा शेअर ८१० रुपयांना खरेदी करावा. स्टॉपलॉस ७९५ रुपयांवर ठेवा.