Stocks to buy today : आठवड्याच्या पहिल्या दिवशी ८ कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला मार्केट एक्सपर्ट्सनी दिला आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बागरिया, आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभूदास लिलाधरच्या उपाध्यक्ष (तांत्रिक संशोधन) वैशाली पारेख या संदर्भात काही शिफारशी केल्या आहेत.
तज्ज्ञांनी सुचवलेल्या स्टॉक्समध्ये इनोव्हा कॅप्टॅब लिमिटेड, फेडरल बँक लिमिटेड, ब्लू स्टार लिमिटेड, स्टेट बँक ऑफ इंडिया लिमिटेड, एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड, टायटन, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे.
इनोव्हा कॅप्टॅब लिमिटेडचा शेअर : इनोव्हा कॅप्टॅब ९५१.५५ रुपयांना खरेदी करा. टार्गेट प्राइस १०१० रुपये ठेवून स्टॉपलॉस ९१५ रुपयांना लावावा.
फेडरल बँक लिमिटेड : फेडरल बँकेचा शेअर २०६.७७ रुपये खरेदी करा. टार्गेट २१६ रुपये ठेवा. स्टॉपलॉस १९९ रुपये लावण्यास विसरू नका.
ब्लू स्टार लिमिटेडचा समभाग: ब्लू स्टारच्या शेअरसाठी १८५० रुपयांचं टार्गेट ठेवून तो १७९० रुपयांपर्यंत खरेदी करा. स्टॉपलॉस १७६० रुपये ठेवा.
एसबीआय : ८७० रुपयांचं टार्गेट ठेवून स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर ८४२ रुपयांपर्यंत खरेदी करा. स्टॉपलॉस ८२० रुपये ठेवण्यास विसरू नका.
अदानी पोर्ट्स: अदानी पोर्ट्स हा शेअर १४१० रुपयांच्या टार्गेट प्राइससह १३५० रुपयांच्या स्टॉप लॉससह १३२५ रुपयांना खरेदी करा.
एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड : ४३९ रुपयांना खरेदी करा, लक्ष्य ४२५ रुपये आणि स्टॉप लॉस ४४८.२ वर ठेवा.
टायटन कंपनी लिमिटेड : ३१७० रुपयांना खरेदी करा, ३४०० रुपयांचं लक्ष्य ठेवा आणि ३०५० रुपयांवर स्टॉपलॉस ठेवायला विसरू नका.
टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड : ९९४ रुपयांना खरेदी करा; १०३० रुपयांचे टार्गेट ठेवा आणि ९८० रुपयांवर स्टॉपलॉस ठेवायला विसरू नका.