Stock Market News Today : चॉइस ब्रोकिंगचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुमित बागरिया यांनी आजसाठी दोन स्टॉक निवडीची शिफारस केली आहे. आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी तीन शेअर सुचविले आहेत. तर, प्रभुदास लिलाधरच्या वैशाली पारेख यांनी तीन शेअर्सवर बोली लावण्याचा सल्ला दिला आहे.
या तीन तज्ज्ञांनी सुचवलेल्या शेअर्समध्ये सीएट लिमिटेड, कॅम्पस अॅक्टिव्हवेअर लिमिटेड, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) आणि आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, व्हीए टेक वाबाग लिमिटेड आणि टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा समावेश आहे.
सीएट लिमिटेड : हा शेअर ३२५३.४५ रुपयांवर खरेदी करा.
कॅम्पस अॅक्टिव्हवेअर लिमिटेड : हा शेअर ३१५.८० रुपयांना खरेदी करा. टार्गेट ३३८ रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस ३०४ रुपये ठेवा.
एचपीसीएल : हा शेअर ४३० रुपयांच्या टार्गेटसाठी ४०० रुपयांच्या स्टॉपलॉससह ४१० रुपयांना खरेदी करा.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड : हा शेअर २९३ रुपयांना खरेदी करा. ३०५ रुपयांच्या टार्गेटसाठी २८५ रुपयांचा स्टॉप लॉस ठेवा.
आयसीआयसीआय बँक लिमिटेड : आयसीआयसीआय बँकेचा शेअर १३०८ रुपयांना खरेदी करा. स्टॉपलॉस १२९० रुपयांवर ठेवून टार्गेट १३४० रुपये ठेवा.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड : महिंद्रा अँड महिंद्रा ३,०४९ रुपयांना खरेदी करा. ३,१६० रुपयांचे लक्ष्य ठेवताना २,९९५ रुपयांवर स्टॉपलॉस ठेवा.
व्हीए टेक वाबाग लिमिटेड : हा शेअर १६४६ रुपयांना खरेदी करा. लक्ष्य किंमत १७२० रुपये आणि स्टॉपलॉस १६१५ रुपयांवर ठेवा.
टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड : हा शेअर १५७.८० रुपयांना खरेदी करा. टार्गेट १६५ रुपये आणि स्टॉप लॉस १५४ रुपये ठेवा.
संबंधित बातम्या