Stocks To Buy Today : कॅलेंडर वर्ष संपत आलं असल्यामुळं शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारही सावध झाले आहेत. नेमकी काय स्ट्रॅटेजी असावी यावर विचार केला जात आहे. अशा परिस्थितीत इंट्रा-डे ट्रेडर्ससाठी तज्ज्ञांनी स्वस्तातल्या काही शेअर्सची सूचना केली आहे.
एसएस वेल्थस्ट्रीटच्या शेअर बाजार तज्ज्ञ सुगंधा सचदेवा, लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीजचे रिसर्च हेड अंशुल जैन आणि हेन्सेक्स सिक्युरिटीजचे एव्हीपी (रिसर्च) महेश एम ओझा यांनी आज ७ शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरचा भाव १०० रुपयांपेक्षाही कमी आहे. यात फेडर्स होल्डिंग, आयएफसीआय, धनलक्ष्मी बँक, एनएचपीसी, एएसआय इंडस्ट्रीज आणि नॅशनल प्लास्टिक इंडस्ट्रीज या कंपन्यांचा समावेश आहे.
फेडर्स होल्डिंग : हा शेअर ७६ रुपयांना खरेदी करा. टार्गेट ७८.८० रुपये आणि स्टॉपलॉस ७४.६० रुपयांवर ठेवा.
आयएफसीआय : आयएफसीआय ६०.६० रुपयांना खरेदी करा. लक्ष्य ६३.५० रुपये ठेवा. स्टॉपलॉस ५८.७० रुपयांना लावा.
धनलक्ष्मी बँक : धनलक्ष्मी बँक ४१ ते ४२ रुपयांना खरेदी करून टार्गेट ४४ रुपये, ४६ रुपये, ४८ रुपये आणि ५० रुपयांपर्यंत ठेवा.
एनएचपीसी : एनएचपीसीला ८० ते ८१.५० रुपयांना खरेदी करा. टार्गेट ८४ रुपये, ८६ रुपये आणि ९० रुपये ठेवा. स्टॉपलॉस ७७.८० रुपये लावा.
एएसआय इंडस्ट्रीज : एएसआय इंडस्ट्रीजचा शेअर ५३.५० रुपयांना खरेदी करून टार्गेट ८० रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस ४६ रुपये (क्लोजिंग बेसिस) ठेवा.
नॅशनल प्लास्टिक इंडस्ट्रीज : हा शेअर ६७ रुपयांना खरेदी करा आणि टार्गेट १०० रुपये ठेवा. स्टॉपलॉस ६० रुपये (क्लोजिंग बेसिस) वर लावा.
अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात केलेली कपात आणि एफआयआयच्या विक्रीमुळं भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी चार आठवड्यांची तेजी पुसून टाकली आहे. सेन्सेक्स गेल्या आठवड्यात ४,००० अंकांनी घसरला. निफ्टी फिफ्टी निर्देशांक २३,७६८ वरून २३,५८७ पर्यंत घसरला आणि आठवडाभरात १,१८१ अंकांची घसरण नोंदवली. गेल्या आठवड्यात बीएसईचा सेन्सेक्स ४००० अंकांनी घसरून ८२,१३३ अंकांवरून ७८,०४१ वर बंद झाला.
संबंधित बातम्या