Stock Market News Update : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक काल १ हजार अंकांनी कोसळला. निफ्टीतही मोठी घसरण झाली. त्यामुळं आज काय होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. अशा परिस्थितीत १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे ५ शेअर्स आज खरेदी करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
एसएस वेल्थस्ट्रीटच्या सुगंधा सचदेवा, लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीजचे रिसर्च हेड अंशुल जैन आणि हेन्सेक्स सिक्युरिटीजचे एव्हीपी (रिसर्च) महेश एम ओझा यांनी या संदर्भात शिफारस केली आहे. त्यांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये सुझलॉन एनर्जी, श्री रेणुका शुगर्स, मेगासॉफ्ट, मराल ओव्हरसीज आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.
कोणता शेअर कोणत्या दरानं खरेदी करायचा आणि किती टार्गेट ठेवायचं हे जाणून घेऊया.
सुझलॉन एनर्जी : ६८ रुपयांना खरेदी करा, ७०.९० रुपयांचं टार्गेट ठेवा आणि ६६.१० रुपयांवर स्टॉपलॉस ठेवा. हा स्टॉपलॉस कायम ठेवून ७१ रुपये, ७४ रुपये आणि ७८ रुपयांच्या टार्गेटसाठी ६८.५० ते ६९.५० रुपयांपर्यंत खरेदी करता येतील.
श्री रेणुका शुगर्स : ४२ रुपयांना खरेदी करा, टार्गेट ४३.१० रुपये ठेवा आणि ४० रुपयांवर स्टॉपलॉस ठेवायला विसरू नका.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया : ५६ ते ५७ रुपये दरानं खरेदी करा, लक्ष्य ५९, ६१ रुपये किंवा ६४ रुपये ठेवा
मेगासॉफ्ट : ७६ रुपयांत खरेदी करा, टार्गेट १०० रुपये आणि स्टॉपलॉस ६९ रुपये (क्लोजिंग बेसिस) वर खरेदी करा.
मराळ ओव्हरसीज : खरेदी ८८ रुपये, टार्गेट १२० रुपये, स्टॉपलॉस ८० रुपये (क्लोजिंग बेसिस). ठेवा.
एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा म्हणाल्या, 'निफ्टी ५० निर्देशांकात सलग दुसऱ्या सत्रात घसरण सुरूच असून, विक्रीच्या दबावामुळं मीडिया स्टॉक वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरून बंद झाले. २४,८८० अंकांवर जोरदार प्रतिकाराला झाल्यानंतर निफ्टीनं गेल्या दोन आठवड्यांत निम्म्याहून अधिक लाभावर पाणी फेरलं आहे.
आज सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कारण, निफ्टी २४,२८० च्या खाली गेल्यास विक्रीचा मोठा दबाव येऊ शकतो. त्यामुळं निर्देशांक २४,००० ते २३,९०० पर्यंत खाली खेचला जाऊ शकतो. याउलट २४,२८० अंक मजबूत राहिल्यास येत्या सत्रात निर्देशांकात अर्थपूर्ण उसळी दिसू शकते, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.