Dividend News in Marathi : लाभांशातून कमाईचा उद्देश ठेवून शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. २९ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या आठवड्यात अनेक कंपन्या शेअर बाजारात एक्स-डिव्हिडंड व्यवहार करतील. त्यामुळंच गुंतवणूकदारांना अजूनही लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे.
पुढच्या काही दिवसांत लाभांश देणाऱ्या कंपन्यांची यादी खालीलप्रमाणे…
३६० वन लेफ्ट लिमिटेड कंपनी एका शेअरवर ४.५ रुपये लाभांश देईल.
Accelya Solutions India Ltd ही कंपनी एका शेअरवर २५ रुपये लाभांश देत आहे.
गोवा कार्बन लिमिटेड कंपनीनं एका शेअरवर १० रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे.
पीसीबीएल लिमिटेड ही कंपनी शेअरमागे ५.५ रुपये लाभांश वितरित करेल.
गोथी प्लासकन (इंडिया) लिमिटेड एका शेअरवर २ रुपये लाभांश देणार आहे.
परसिस्टंट सिस्टिम्स लिमिटेड कंपनी एका शेअरवर ३२ रुपये लाभांश देत आहे.
सिमेन्स लिमिटेड कंपनीनं प्रत्येक शेअरवर १० रुपयांचा अंतिम लाभांश जाहीर केलाय.
मेट्रो ब्रँड्स ही कंपनी पात्र गुंतवणूकदारांना शेअरमागे २.७५ रुपये लाभांश देईल.
पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडनं २ रुपये अंतरिम लाभांश जाहीर केलाय.
सूरज लिमिटेड ही कंपनी देखील लाभांश देत आहे.
बिगब्लॉक कन्स्ट्रक्शन लिमिटेड एका शेअरवर ०.२ रुपये लाभांश देईल.
सीईएसई लिमिटेडनं प्रत्येक शेअरवर ४.५ रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे.
हॅवेल्स इंडिया लिमिटेडनं ३ रुपयांचा लाभांश जाहीर केलाय.
पूर्वंकरा लिमिटेडनं एका शेअरवर ६.३ रुपये लाभांश देऊ केला आहे.
रूट मोबाइल लिमिटेड एका शेअरवर ३ रुपये लाभांश देणार आहे.
टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेड एका शेअरवर ३ रुपये लाभांश देईल.
Wendt (India) Ltd कंपनी पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर ३० रुपये लाभांश देणार आहे.
बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड एका शेअरवर ४ रुपये लाभांश देतेय.
कंट्रोल प्रिंट लिमिटेड गुंतवणूकदारांना शेअरमागे ४ रुपये देणार आहे.
इंडियन एनर्जी एक्सचेंज लिमिटेडनं प्रति शेअर १ रुपये अंतरिम लाभांश जाहीर केलाय.
केवल किरण क्लोदिंग लिमिटेड २ रुपये अंतरिम लाभांश देणार आहे.
एमआरपीएल कंपनी एका शेअरवर १ रुपये लाभांश देत आहे.
ओबेरॉय रियल्टी लिमिटेड प्रत्येक शेअरवर २ रुपये अंतरिम लाभांश देणार आहे.
शेअर इंडिया सिक्युरिटीज लिमिटेडनं ३ रुपये लाभांश जाहीर केलाय.
झेन्सार टेक्नॉलॉजीस लिमिटेड प्रत्येक शेअरवर ३ रुपये लाभांश देत आहे.
(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)
संबंधित बातम्या