Kawasaki Eliminator 500: कावासाकी एलिमिनेटर ५०० बाईकची भारतीय बाजारात दणक्यात एन्ट्री!-2024 kawasaki eliminator 500 cruiser launched in india priced at rs 5 62 lakh ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Kawasaki Eliminator 500: कावासाकी एलिमिनेटर ५०० बाईकची भारतीय बाजारात दणक्यात एन्ट्री!

Kawasaki Eliminator 500: कावासाकी एलिमिनेटर ५०० बाईकची भारतीय बाजारात दणक्यात एन्ट्री!

Jan 03, 2024 09:01 PM IST

Kawasaki New Bike: कावासाकी एलिमिनेटर ५०० ही बाईक रॉयल एनफील्ड शॉटगन ६५० आणि बेनेली ५०२ सी शी स्पर्धा करेल.

Kawasaki Eliminator 500
Kawasaki Eliminator 500

Kawasaki Eliminator 500 Launched In India: कावासाकी एलिमिनेटर ५०० ही नवीन वर्षात लाँच होणारी पहिली मोटरसायकल ठरली आहे. ही बाईक गेल्या वर्षी जागतिक बाजारात लॉन्च झाली होती. भारतीय बाजारात या बाईकची एक्स-शोरूम किंमत ५.६२ लाख रुपये आहे. भारतीय बाजारपेठेत ती थेट रॉयल एनफील्ड शॉटगन ६५० आणि बेनेली ५०२ सी शी स्पर्धा करेल. बेनेली मॉडेलची किंमत ५.८५ लाख रुपये आहे.

या मोटरसायकलमध्ये नवीन ४५१ सीसी पॅरलल विन मोटर बसवण्यात आली, जी कावासाकी निन्जा ४०० इंजिनमधून घेण्यात आली. या बाईकमध्ये ६.८ मिमी लांब स्ट्रोक, एक मोठा एअरबॉक्स आणि ३२ मिमी बटरफ्लाय बॉडी मिळते. दरम्यान, ४०० सीसी च्या तुलनेत कावासाकीने हे इंजिन अधिक टॉर्क जनरेट करण्यासाठी आणि उत्तम चालण्यायोग्यता निर्माण करण्यासाठी विकसित केले आहे. त्याची रेडलाइन थोडी कमी आहे.

कावासाकी एलिमिनेटर ५०० चे इंजिन ९ हजार आरपीएमवर ४५ एचपी आणि ६ हजार आरपीएमवर ४२.६ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन नुकतेच EICMA 2023 मध्ये नवीन निन्जा कावासकी ५०० आणि झेड ५०० मध्ये सादर करण्यात आले. स्लिप/असिस्ट क्लचसह सहा-स्पीड गिअरबॉक्सशी पॉवर जोडली जाते.

व्हल्कनमध्येही अनेक समानता आहेत. वल्कनप्रमाणेच ही एक लांब आणि कमी उंचीची मोटरसायकल आहे. यात मोठे १८ इंचाचे फ्रंट व्हील देखील आहे. Vulcan च्या १७ इंच चाकाच्या तुलनेत एलिमिनेटरला १६ इंचाचे मागील चाक मिळते. यामध्ये ड्युअल चॅनल एबीएस स्टँडर्ड आहे.

कावासाकी एलिमिनेटर ५०० बाईक ७.३४ मिमीच्या कमी आसन उंचीसह लहान रायडर्सना आकर्षित करेल. कावासकी वल्कन ६५० प्रमाणे या मोटरसायकलमध्ये कावासकीची इर्गो फीटप्रणाली देखील आहे, जी ग्राहकांना विविध पर्यायी हँडलबार आणि फूट पेग सेट-अपमधून निवडण्याची परवानगी देते. त्याची ग्राउंड क्लीयरन्स १५० मिमी आहे. या बाईकचे वजन १७६ किलो आहे, जे कावासकी वल्कनच्या तुलनेत फारच कमी आहे. कावासाकी वल्कनचे वजन २३५ आहे.

Whats_app_banner
विभाग