ह्युंदाई अल्काझार भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि बरेच काही-2024 hyundai alcazar launched check prices new features and more here ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ह्युंदाई अल्काझार भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि बरेच काही

ह्युंदाई अल्काझार भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि बरेच काही

Sep 09, 2024 08:59 PM IST

2024 Hyundai Alcazar Launched: ह्युंदाई अल्काझार भारतात लॉन्च झाली आहे. या कारमध्ये ग्राहकांना कोणकोणते फीचर्स मिळत आहेत? या कारची किंमत किती? याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

ह्युंदाई अल्काझार भारतात लॉन्च
ह्युंदाई अल्काझार भारतात लॉन्च

2024 Hyundai Alcazar Launched In India: ह्युंदाई अल्काझारची लेटेस्ट एडिशन सोमवारी भारतात अधिकृतरित्या लॉन्च करण्यात आली. त्याची सुरुवातीची किंमत १४.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम, इंट्रोडक्टरी) आहे. अल्काझार बहुतेकदा अत्यंत लोकप्रिय ह्युंदाई क्रेटाची मोठी बहीण मानली जाते. ही कार बाजारात दाखल झाल्यानंतर मोठी पसंती मिळवेल, अशी अपेक्षा केली जात आहे.  भारतीय बाजारपेठेत तीन वर्षांत ७५ हजाराहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. तर सुमारे २७,००० परदेशातही निर्यात झाली आहे.

नवीनतम ह्युंदाई अल्काझार आधीच्या मॉडेलपेक्षा लक्षणीय भिन्न आहे.  या कारमध्ये एच आकाराचे एलईडी डीआरएल, क्वाड बीम एलईडी हेडलाइट्स, अधिक स्पष्ट ग्रिल आणि जाड स्किड प्लेट्स हे मुख्य बदल असल्याने त्याच्या बाह्य डिझाइनला महत्त्वपूर्ण अपडेट मिळाले आहे.  अल्काझार मध्ये १८ इंचाच्या डायमंड-कट अलॉय व्हील मिळते. तसेच या कारमध्ये कनेक्टेड एलईडी टेललाइट्स, नवीन टेलगेट डिझाइन आणि नवीन स्पॉइलर मिळत आहे. या कारची लांबी ४ हजार ५६० मिमी आहे. तर, एसयूव्हीची रुंदी आणि उंची अनुक्रमे १,८०० मिमी आणि १ हजार ७०० मिमी आहे. व्हीलबेसही २ हजार ७६० मिमी इतकाच आहे.

२०२४ ह्युंदाई अल्काझार एक्झिक्युटिव्ह, प्रेस्टीज, प्लॅटिनम आणि सिग्नेचर या चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. कोरियन ऑटो जायंट ने या एसयूव्हीला सात सीटर पर्यायासह सहा सीटर व्हर्जनसह दोन प्रकारचे सीटिंग कॉन्फिगरेशन दिले आहे. तर पेट्रोल व्हेरियंटची किंमत १४.९९ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम, इंट्रोडक्टरी) सुरू होते. डिझेल व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत १५.९९ लाख रुपये आहे.

ह्युंदाई अल्काझार: कलर

ह्युंदाई नवीन अल्काझारमध्ये आठ मॉन-टोन आणि एक ड्युअल टोन एक्सटीरियर कलर ऑप्शन उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये रोबस्ट एमराल्ड मॅट आणि टायटन ग्रे मॅट रंगांबरोबरच रोबस्ट एमराल्ड, स्टारी नाईट, रेंजर खाखी, फायरी रेड, अ‍ॅबिस ब्लॅक, अ‍ॅटलस व्हाईट आणि अ‍ॅटलस व्हाईट विथ ब्लॅक रूफ ड्युअल टोन पर्याय देण्यात आला आहे.

ह्युंदाई अल्काझार: इंजिन

लेटेस्ट ह्युंदाई अल्काझार दोन इंजिन ऑप्शनमध्ये येणार आहे. १.५ लीटर टर्बो जीडीआय पेट्रोल इंजिन आहे जे १५८ बीएचपी पॉवर आणि २५३ एनएम टॉर्क जनरेट करू शकते. हे इंजिन ६-स्पीड मॅन्युअल किंवा ७-स्पीड डीसीटीसोबत येईल. यात १.५ लीटर यू२ सीआरडीआय डिझेल मोटर आहे, जी ११४ बीएचपी पॉवर आणि २५० एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन सहा-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा सहा-स्पीड ऑटोमॅटिक युनिटसह जोडले गेले आहे.

ह्युंदाई अल्काझार: मायलेज

ह्युंदाई अल्काझार फेसलिफ्ट एसयूव्ही २०.४ किमी प्रतिलीटरपर्यंत मायलेज देईल. एआरएआयने चाचणी केल्याप्रमाणे कार निर्मात्याने २०२४ अल्काझारची इंधन कार्यक्षमतेची आकडेवारी सामायिक केली. चाचणीच्या निकालानुसार, टर्बो पेट्रोल इंजिन असलेले व्हेरिएंट ट्रान्समिशन पर्यायांनुसार १७.५ किमी प्रतिलीटर ते १८ किमी प्रति लीटर दरम्यान ऑफर करतील. एसयूव्हीच्या डिझेल व्हर्जनमध्ये ऑटोमॅटिक गियरबॉक्स व्हेरिएंटसह १८.१ किमी प्रति लीटर आणि मॅन्युअल ट्रान्समिशन युनिटसह २०.४ किमी/लीटर ची पॉवर मिळेल.

Whats_app_banner
विभाग