मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bajaj Electric Scooter: बाजारात येतेय बजाजची इलेक्ट्रिक स्कूटर; ओला आणि एथरला कंपनीला देणार टक्कर!

Bajaj Electric Scooter: बाजारात येतेय बजाजची इलेक्ट्रिक स्कूटर; ओला आणि एथरला कंपनीला देणार टक्कर!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 04, 2024 10:56 PM IST

2024 Bajaj Chetak electric scooter price: बजाजने त्यांची नवी इलेक्ट्रीक स्कूटर भारतीय बाजारात लॉन्च केली आहे.

2024 Bajaj Chetak electric scooter
2024 Bajaj Chetak electric scooter

े2024 Bajaj Chetak Electric Scooter Features: भारतीय दुचाकी निर्माता कंपनी बजाज ऑटोने चेतक इलेक्ट्रिक स्कूटर लाइनअपमध्ये आपले नवीन अपडेट केलेले मॉडेल लॉन्च केले. बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची स्पर्धा ओला आणि एथर कंपनीशी असेल. ही स्कूटर अर्बन आणि प्रीमियम दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. ज्याची किंमत अनुक्रमे १. लाख रुपये (एक्स शोरूम) आणि १.१५ लाख (एक्स- शोरूम) इतकी आहे.

२०२४ बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ५ इंचाचा टीएफटी डिस्प्ले मिळत आहे. या बाईकच्या प्रीमिअम व्हेरिएंटमध्ये टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, म्यूजिक कंट्रोल, कॉल मॅनेजमेन्ट आणि कस्टूमाइज थीम पाहायला मिळेल. बजाज चेतक प्रीमिअम स्कूटरमध्ये ३.२ kWh ची बॅटरी मिळते, जी एकदा चार्ज केल्यानंतर १२७ किलोमीटरचे अंतर कापते. ही स्कूटर ८०० वॅटसह अवघ्या ३ तास ५० मिनिटात पूर्ण चार्ज होते. तर, अर्बन व्हेरिएंट एका चार्जमध्ये ११३ किलोमीटर अंतर धावते. ही स्कूटर पूर्ण चार्ज होण्यासाठी ४ तास ५० मिनिट घेते.

प्रीमियम मॉडेल ३ रंगात उपलब्ध असेल, ज्यात इंडिगो ब्लू, ब्रुकलिन ब्लॅक आणि हेझलनट यांचा समावेश आहे. तर, अर्बन मॉडेल ट्रिम थिक ग्रे, सायबर व्हाईट, ब्रुकलिन ब्लॅक आणि इंडिगो मेटॅलिक ब्लू अशा चार रंगामध्ये उपलब्ध आहे.

या इलेक्ट्रिक स्कूटरला भारतीय बाजारात खूप पसंती मिळाली आहे. २०१९ मध्ये लॉन्च झाल्यापासून, चेतक इलेक्ट्रिक स्कूटर १४० शहरांमध्ये पोहोचली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या आतापर्यंत एक लाखांहून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत.

WhatsApp channel

विभाग