Share Market News : इंट्राडे ट्रेडिंगसाठी शेअर मार्केटमधील तज्ज्ञांनी आज १० शेअर्सची शिफारस केली आहे. चॉइस ब्रोकिंगचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुमित बागरिया यांनी ७ शेअर, आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी तीन स्टॉक आयडिया सुचविल्या आहेत. यात इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड (इंडिगो), मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड, युनियन बँक ऑफ इंडिया, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड यांचा समावेश आहे.
तज्ज्ञांनी सुचवलेल्या हे शेअर सध्या कोणत्या पातळीवर ट्रेड करत आहेत. त्यांचा भाव कितीवर जाऊ शकतो? हे शेअर खरेदी करताना स्टॉपलॉस किती असावा जाणून घेऊया…
इनोव्हा कॅप्टॅब : इनोव्हा कॅप्टॅब १०६८ रुपयांना खरेदी करा, टार्गेट ११५० रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस १०३० रुपये ठेवा.
पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज : पीजीआयएल १४२० वर खरेदी करा, लक्ष्य १५१५ रुपये ठेवा आणि स्टॉप लॉस १३७० रुपये ठेवा.
गरवारे टेक्निकल फायबर्स : हा शेअर ४४७० रुपयांना खरेदी करावा, टार्गेट ४७७७ रुपये ठेवावं आणि स्टॉपलॉस ४३०० रुपये ठेवावा.
झॅगल प्रीपेड : झॅगल प्रीपेड ५७० रुपयांना खरेदी करा. टार्गेट ६१० रुपयांचं ठेवा आणि ५५० रुपयांचा स्टॉप लॉस लावा.
शीला फोम: हा शेअर ९८८ रुपयांना खरेदी करा. लक्ष्य १०५० रुपये ठेवा आणि स्टॉप लॉस ९५० रुपये ठेवा.
इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड (इंडिगो) - इंटरग्लोब एव्हिएशन ४७२५ रुपयांना खरेदी करा. स्टॉपलॉस ४५५५ रुपयांवर ठेवा आणि ५०५० रुपयांचं लक्ष्य ठेवा.
मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड : मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन २४४.२२ रुपयांना खरेदी करून स्टॉपलॉस २६० रुपये लावा आणि टार्गेट २३५ रुपयांचं ठेवा.
युनियन बँक ऑफ इंडिया : युनियन बँकेचा शेअर ११९ रुपयांना खरेदी करा. टार्गेट १३० रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस ११५ रुपयांवर ठेवा.
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड : हा शेअर ४३० रुपयांच्या टार्गेट प्राइससह ४१२ रुपयांच्या स्टॉप लॉससह ४२० रुपयांना खरेदी करा.
गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड : हा शेअर ११३० रुपयांना खरेदी करा. टार्गेट ११८० रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस १०९० रुपये ठेवा.
संबंधित बातम्या