Poco: पोको बाजारात धमाका करणार! बजेट- फ्रेंडली फोनमध्ये देतायेत १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा, 'या' दिवशी होतोय लॉन्च
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Poco: पोको बाजारात धमाका करणार! बजेट- फ्रेंडली फोनमध्ये देतायेत १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा, 'या' दिवशी होतोय लॉन्च

Poco: पोको बाजारात धमाका करणार! बजेट- फ्रेंडली फोनमध्ये देतायेत १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा, 'या' दिवशी होतोय लॉन्च

Published Jul 26, 2024 04:12 PM IST

108 MP Camera Smartphones: पोकोचा बजेट- फ्रेंडली स्मार्टफोन पोको एम ६ प्लस 5G स्मार्टफोन पुढच्या महिन्यात भारतीय बाजारात लॉन्च होत आहे.

या दिवशी लॉन्च होतोय पोको एम ६ प्लस 5G स्मार्टफोन
या दिवशी लॉन्च होतोय पोको एम ६ प्लस 5G स्मार्टफोन

Budget Friendly Smartphones: पोकोचा नवा फोन पोको एम ६ प्लस 5G भारतात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा फोन १ ऑगस्ट रोजी भारतीय बाजारात दाखल होणार असल्याची माहिती कंपनीने दिली. रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, हा एक बजेट-फ्रेंडली 5G फोन असेल. या फोनचे लँडिंग पेज फ्लिपकार्टवर लाईव्ह करण्यात आले. भारतात ०१ ऑगस्ट २०२४ ला लॉन्च करण्यात येणार आहे. पोको एफ ६ डेडपूल लिमिटेड एडिशन आज भारतात लॉन्च होणार आहे.

पोको एम ६ प्लस 5G च्या लँडिंग पेजवरून असे दिसून येते की, याच्या मागील बाजूस ड्युअल टोन डिझाइन असेल. फोनच्या फ्रंटला पंच-होल कटआऊट देण्यात आला आहे, ज्यात सेल्फी कॅमेरा असेल. फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. या फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला. यात रिंग एलईडी फ्लॅश लाइट देखील देण्यात आली. याशिवाय ब्रँडने या फोनबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

रिपोर्ट्सनुसार, पोको एम ६ प्लसमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७ इंचाचा आयपीएस एलसीडी फुल एचडी प्लस डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ४ जेन २ चिप, ८ जीबी पर्यंत रॅम, १२८ जीबी पर्यंत स्टोरेज, १३ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, १०८ मेगापिक्सल ड्युअल कॅमेरा सेटअप आणि ३३ वॅट फास्ट चार्जिंगसह ५०३० एमएएच बॅटरी मिळू शकते. एम ६ प्लसची किंमत भारतात १३००० ते १५००० रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

पोको एम ६ प्लस 5G व्यतिरिक्त काही नवे फोनही लवकरच भारतीय बाजारात लॉन्च केले जाणार आहेत. यामध्ये २९ जुलै रोजी ओप्पो के १२ एक्स, ३० जुलै रोजी रियलमी १३ प्रो आणि १३ प्रो प्लस, ३१ जुलै रोजी नथिंग फोन (२ ए) प्लस, १ ऑगस्ट रोजी मोटोरोला एज ५०, ५ ऑगस्ट रोजी इनफिनिक्स नोट ४० एक्स 5G आणि ऑगस्टच्या सुरुवातीला विवो व्ही ४० आणि व्ही ४० प्रो यांचा समावेश आहे. फ्लिपकार्टच्या माध्यमातून या डिव्हाइसची विक्री केली जाणार आहे. याव्यतिरिक्त, आयक्यूओओ झेड ९ एस सीरिज, ज्यात आयक्यूओ झेड ९ एस आणि आयक्यूओ झेड ९ एस प्रो चा समावेश आहे, जे भारतात ऑगस्टमध्ये लॉन्च केला जाईल. या फोनची विक्री अॅमेझॉनच्या माध्यमातून केली जाणार आहे.

Whats_app_banner