पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रतिष्ठित असे लक्ष्मीपुर अंडरग्राउंड पंपिंग स्टेशन एमईआयएलद्वारा सुरु

प्रतिष्ठित असे लक्ष्मीपुर अंडरग्राउंड पंपिंग स्टेशन एमईआयएलद्वारा सुरु

ठळक वैशिष्ट्ये

  • पंपहाऊसमध्ये जगभरातील सर्वाधिक पंपिंग आणि मोटर क्षमता आहे
  • प्रत्येकी १३९ एमडब्ल्यू क्षमतेसह ७ मोटर्ससह आणि सर्व उपसाधने २३७६ एमटीसह १ युनिटसह सुसज्ज 
  • हे प्रति दिन २ टीएमसी पाणी उचलू शकते, जे जगातील सर्वाधिक आहे 
  • जमिनीखालील सर्वात मोठी गुहा आणि २०३ किमीपेक्षा जास्त अशा योजनेत आशियातील सर्वात लांब बोगदा 
  • विशेष अशा ४००/१३.८/११ केव्ही सब-स्टेशनसह जगातील सर्वात पहिला जमिनीखालील १६० एमव्हीए पंप ट्रान्स्फॉर्मर 
  • अविरत पंपिंगच्या खात्रीसाठी जगातील सर्वात मोठे उल्लोल पूल्स असलेले

मेघा इंजिनियरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने (एमईआयएल) कालेश्वरम लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्टमध्ये आणखी एक गौरवशाली यश संपादन केले आहे. एमईआयएलने लक्ष्मीपुर अंडरग्राउंड पंपिंग स्टेशन (एलयूपीएस – पॅकेज ८) हे जगातील सर्वात मोठे कार्यान्वयन सुरु केले आहे. या पंप हाऊसला देवी गायत्रीवरून नाव ठेवण्यात आलेल्या या पंप हाऊसने ११ ऑगस्ट रोजी रात्री एलयूपीएसमध्ये ५ वे मशीन सुरु केल्यावर त्याने सफलतापूर्वक वेट रन पूर्ण केले आहे. यासोबत, सुमारे ३००० क्युसेक्स पाणी १११ मीटर्स वरपर्यंत उचलले गेले आणि ग्रॅविटी कॅनलद्वारा मनेयारमध्ये सोडले गेले. तेलंगणचे सीएम श्री. के. चंद्रशेखर राव १४ ऑगस्ट रोजी या पंपिंग स्टेशनचे उद्घाटन करण्याची शक्यता आहे. 

एमईआयएलने पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाच्या नियमाच्या विरुद्ध नदीच्या प्रवाहाच्या दिशेकडून त्याच्या विरुद्ध दिशेत यशस्वीपणे गोदावरी नदीची दिशा बदलली आहे. प्राणहित – गोदावरी नदी मेडीगद्दाकडून अन्नाराम आणि सुंदिल्लामार्गे एलयूपीएसकडे पोहोचण्यासाठी मागील दिशेत वाहिल. जागतिक उपसा सिंचनाच्या क्षेत्रातील ऐतिहासिक घटना बनलेली कालेश्वरम लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्टचे लक्ष्मीपूर अंडरग्राउंड पंपिंग स्टेशन केवळ ३ वर्षांमध्ये पूर्ण झाले. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या ४७० फूट खाली जगातील सर्वात मोठे जमिनीखालील पंपिंग स्टेशन निर्माण केल्याने केएलआयपीच्या शिरपेचात आणखी एक इंजिनियरिंगच्या मानाचा तुरा खोवला गेला आहे. एलयूपीएस संपूर्ण वर्षभर या नदीच्या पट्ट्यात अनेक जलाशयांमध्ये संचय साध्य करू शकेल.

 “केएलआयपी या या उद्योगातील सर्वाधिक नाविन्यपूर्ण असा महाप्रकल्प आहे. त्यात जमिनीखाली एक पंपहाऊस आहे, जो दुहेरी बोगद्यांसह जमिनीच्या ४७० फूट खाली आहे आणि जगातील सर्वात मोठे उल्लोल पूल्स आहेत. हा जगातील एक अति-प्रचंड असा प्रकल्प आहे, ज्यात प्रत्येकी १३९ एमडब्ल्यू क्षमतेचे ७ मोटर्स आहेत. हे मोटर्स रोज ३ टीएमसी पाणी उचलू शकतात. हे संपादन ‘मेक इन इंडिया’ आहे कारण मोटर्स भारतात बनविलेले आहेत आणि ते कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनामिक्स (सीएफडी) तंत्रज्ञानावर आधारित आहेत. सर्व विद्युत आधारभूत संरचना ३०५७ एमडब्ल्यू क्षमतेसह बनविलेली आहे, ज्यात सहा ४०० केव्ही आणि २२० केव्ही सबस्टेशन्स, ट्रान्सफॉर्मर्स आणि २६० किमी ट्रान्स्मिशन लाईन्स, ७ किमी ४०० केव्ही एक्सएलपीई अंडरग्राउंड केबल यांचा समावेश आहे. यातील इतर मुख्य वैशिष्ट्यामध्ये ४१३३ मीटर लांबीचे आणि १० मीटर व्यासाचे दुहेरी बोगदे आहेत, जगातील सर्वात मोठे उल्लोल पूल्स आहेत आणि असामान्य आकाराचा पंप हाऊस आहे.” असे श्री. बी. श्रीनिवास रेड्डी, डायरेक्टर, एमईआयएल यांनी सफलतेच्या शृंखलेविषयी बोलताना सांगितले.

उपसा सिंचन प्रकल्प सहसा भूतलीय पातळीवर निर्माण उभारले जातात. तथापि, प्रति दिन २ टीएमसी क्षमतेच्या पाण्याच्या पंपिंगच्या क्षमतेचा जमिनीखाली एलयूपीएस बनविण्यात आला आहे. प्रचंड प्रमाणात भूजल पाणी पंप्स आणि मोटर्सद्वारा उचलण्यासाठी २१.६ लाख क्यूमी माती पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या ४७० फुट खालून काढण्यात आली आहे. १३९ एमडब्ल्यू पॉवरसह मोटर्स चालविण्यासाठी १६० केव्हीए क्षमतेचा पंप ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे.

या प्रकल्पात चार उल्लोल पूल्स आहेत, जे संचयासाठी पाण्याच्या अविरत पंपिंगची सुनिश्चिती करतात. पुढे, जमिनीच्या खाली १३८ मीटर खोलीवर टर्बाईन पंप्स बसविले आहेत. प्रत्येक मोटरचे वजन सुमारे २,३७६ मेट्रिक टन आहे, ज्यामुळे त्यांना ‘मेगा मोटर्स’ म्हटले जाते.   

अशा क्लिष्ट आणि अत्यंत खर्चिक विद्युत-यांत्रिक कामांमधील आपल्या ३० वर्षांच्या समृद्ध अशा यांत्रिक कुशलतेसह मेघा इंजिनियरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडद्वारा (एमईआयएल) या प्रकल्पाची अंमलबजावणी होत असून याचे ध्येय शेतजमीनींना वेळेवर पाणी पुरविणे आणि तेलंगणवासीयांची तहान भागविणे हे आहे. 

 “तेलंगणच्या स्वप्नवत प्रकल्पाचा आणि जगातील सर्वात मोठ्या उपसा सिंचन प्रकल्पाचा, केएलआयपीचा भाग बनतांना आम्हाला अत्यंत गौरवान्वित वाटत आहे, जगातील सर्वोत्कृष्ट इंजिनियरिंग पुरवठादारांसह समन्वयाद्वारा विश्वस्तरीय तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणे आणि तेलंगणच्या स्वप्नांना पूर्ण करणे, हा एक विशेषाधिकार आणि आजीवन संधी संधी आहे. सीएम श्री. के. चंद्रशेखर राव यांच्या देखरेखीने आणि दृढनिश्चयाने आमच्या चमूला वेळेवर प्रकल्प पूर्ण करण्याची प्रेरणा दिली.” असे श्री. रेड्डी यांनी विक्रम प्रस्थापित करणाऱ्या पंपिंग स्टेशनविषयी विचारल्यावर सांगितले. 

जगातील सर्वात मोठ्या पंपहाऊसविषयी जाणून घेण्यासाठी, The Fact Sheet Of KLIP वर भेट द्या.

स्रोत: Digpu

(महत्त्वाची सूचना : वरील मजकूर Digpu कडून प्रसारित करण्यात आला आहे. या मजकुराच्या निर्मितीमध्ये HT समूहातील कोणत्याही पत्रकाराचा समावेश नाही. )