Hindustan Times Marathi Authors list: Get the complete list of HT Marathi authors | Hindustan Times Marathi
मराठी बातम्या  /  लेखकाचा परिचय

सर्व संपादक

Aiman Jahangir Desai

eMail

ऐमान देसाई हिंदुस्तान टाइम -मराठीमध्ये कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. ऐमान मनोरंजन आणि लाइफस्टाइल क्षेत्रातील घडामोडी कव्हर करते. यापूर्वी ऐमानने न्यूज १८ लोकमतसाठी काम केले आहे.

Ninad Deshmukh

TwittereMail

"निनाद देशमुख हिंदुस्तान टाइम्स-मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून २०२२ पासून कार्यरत आहे. निनादने पुणे विद्यापीठातून एमए (जर्नलिझम) शिक्षण घेतले आहे. पुण्यातील केसरी वृत्तपत्रातून २००७ मध्ये बातमीदार म्हणून करियरची सुरूवात. २००९ ते २०२२ पर्यंत लोकमत, पुणे येथे वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केले. निनादला डिफेन्स, सायन्स, अंतराळ विज्ञान, आंतरराष्ट्रीय राजकारण विषयांची विशेष आवड आहे. "

Ganesh Pandurang Kadam

TwittereMail

गणेश कदम २०२२ पासून हिंदुस्तान टाइम्स- मराठीमध्ये सहाय्यक संपादक म्हणून कार्यरत आहे. गणेश गेली २० वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून यापूर्वी लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, सामना या दैनिकांमध्ये काम केले आहे. राजकीय वार्ताहर म्हणून त्यांनी अनेक राजकीय सभा, आंदोलने व विधीमंडळाची अधिवेशने कव्हर केली आहेत. २०१२ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारिता सुरू केली. गणेशला राजकारण, अर्थकारणाबरोबरच साहित्य व संगीत विषयक घडामोडींची विशेष आवड आहे.

Ashwjeet Jagtap

TwittereMail

अश्वजीत जगताप हिंदुस्तान टाइम्स मराठीमध्ये सीनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहे. अश्लजीत येथे राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स, टेक्नोलॉजी, ऑटो, व्हायरल न्यूज आणि करिअर संबंधित बातम्या लिहितो. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात एकूण ५ वर्षांचा अनुभव आहे. यापूर्वी लेटेस्टली- मराठी (डिजिटल), एबीपी माझा (डिजिटल) मध्ये कामाचा अनुभव. अश्वजीतला क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळणे आणि बायोपिक चित्रपट पाहायला आवडतात.

Aarti Vilas Borade

TwittereMail

आरती बोराडे हिंदुस्तान टाइम्स-मराठीमध्ये कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून काम करते. आरती डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ५ वर्ष कार्यरत असून मनोरंजन विश्वातील घडामोडी, कलाकारांच्या विशेष मुलाखती घेण्याची आवड आहे. त्यासोबतच ट्रेंडिग व लाइफस्टाइलशी संबंधीत बातम्यांवर देखील तिची नजर असते. यापूर्वी लोकसत्ता (डिजिटल) मध्ये काही काळ काम केले आहे.

Priyanka Chetan Mali

TwittereMail

प्रियंका माळी ही हिंदुस्तान टाइम्स -मराठीमध्ये कन्टेन्ट रायटर असून ती राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषयांचा अभ्यास करून योग्य ती अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहचवत असते. प्रियंकाने बी कॉम आणि पत्रकारिता डिप्लोमा कोर्स केला असून ती ५ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. एका स्थानिक मीडिया चॅनलमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून प्रियंकाने करिअरची सुरूवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स (डिजिटल) मध्ये भविष्य सेक्शनसाठी कन्टेन्ट रायटर म्हणून २ वर्ष काम केले आहे. प्रियंकाला फावल्या वेळेत वाचन करण्याची आणि कविता लिहिण्याची आवड आहे.

Haaris Rahim Shaikh

TwittereMail

हारीस शेख हे हिंदुस्तान टाइम्स -मराठीचे संपादक आहेत. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स (ऑनलाइन)चे संपादक म्हणून काम केले आहे. तत्पूर्वी मटा (ऑनलाइन)चे दिल्ली प्रतिनिधी, ईटीव्ही -मुंबई ब्युरोमध्ये प्रतिनिधी म्हणून काम केले. टिव्ही, प्रिंट आणि डिजिटल न्यूज माध्यम क्षेत्रात २३ वर्ष काम करण्याचा अनुभव. राजकारण, अर्थजगत, आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयांवर नियमित लिखाण.

Divya Lakhera

eMail

testing

Ninad Vijayrao Deshmukh

TwittereMail

निनाद देशमुख हिंदुस्तान टाइम्स-मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून २०२२ पासून कार्यरत आहे. निनादने पुणे विद्यापीठातून एमए (जर्नलिझम) शिक्षण घेतले आहे. पुण्यातील केसरी वृत्तपत्रातून २००७ मध्ये बातमीदार म्हणून करियरची सुरूवात. २००९ ते २०२२ पर्यंत लोकमत, पुणे येथे वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केले. निनादला डिफेन्स, सायन्स, अंतराळ विज्ञान, आंतरराष्ट्रीय राजकारण विषयांची विशेष आवड आहे.

Harshada Sunil Bhirvandekar

TwittereMail

हर्षदा भिरवंडेकर हिंदुस्तान टाइम्स - मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. हर्षदाने मुंबईच्या साठे महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून मनोरंजन विश्वातील घडामोडींबद्दल विशेष आवड आहे. हर्षदाने यापूर्वी झी मराठी दिशा, मुंबई तरुण भारत, टीव्ही ९-मराठी, एबीपी माझा वेबसाइटमध्ये काम केले आहे.

Hiral Shriram Gawande

TwittereMail

हिरल गावंडे हिंदुस्तान टाइम्स- मराठीमध्ये डेप्युटी चीफ कन्टेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून ती लाइफस्टाईल संबंधित बातम्या लिहिते. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण ११ वर्षांचा अनुभव आहे. यापूर्वी हिरलने दैनिक दिव्य मराठी आणि ट्रेल अॅपमध्ये काम केले आहे. हिरलने एमए (समाजशास्त्र) आणि पुणे विद्यापीठाच्या रानडे इंस्टिट्युट येथून पीजी डिप्लोमा इन मास मिडियाचे शिक्षण घेतले आहे.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Harshada Bhirvandekar

TwittereMail

हर्षदा भिरवंडेकर हिंदुस्तान टाइम्स - मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. हर्षदाने मुंबईच्या साठे महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून मनोरंजन विश्वातील घडामोडींबद्दल विशेष आवड आहे. हर्षदाने यापूर्वी झी मराठी दिशा, मुंबई तरुण भारत, टीव्ही ९-मराठी, एबीपी माझा वेबसाइटमध्ये काम केले आहे.