आज मंगळवार, २ जुलै २०२४ रोजी चंद्र मेष राशी सोडून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. या तिथीलाच योगिनी एकादशीचे व्रत केले जाते. शिवाय आज ग्रहांच्या देखील विविध हालचाली दिसून येत आहेत. या हालचालींमधून अनेक योग निर्माण होत आहेत. आज योगिनी एकादशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि कृतिका नक्षत्र यांचाही शुभ संयोग होत असल्याने आज मंगळवारच्य दिवसाचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. आज त्रिपुष्कर योग कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरणार ते जाणून घेऊया.
आज त्रिपुष्कर योगात वृषभ राशीला दिवस अगदी उत्तम जाणार आहे. या योगात तुम्हाला विविध चांगले अनुभव येतील. अनेक दिवसांपासून रेंगाळली कामे अचानक पूर्ण होतील. त्यामुळे मनावरचा ताण नाहीसा होईल. या योगात तुम्ही अतिशय सकारात्मक असणार आहात. मनात एखाद्या व्यवसायची योजना असेल, तर ती आज प्रत्यक्षात उतरविण्यात यशस्वी व्हाल. नोकरदारवर्गाला वरिष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. एखादी मोठी जबाबदारी पदरात पडेल. अनपेक्षित मार्गाने धनलाभ होईल. आर्थिक स्थिती भक्कम होईल.
कन्या राशीच्या लोकांना त्रिपुष्कर योगाचा विशेष लाभ मिळणार आहे. याकाळात तुम्ही ठरवलेले सर्व कार्य पूर्ण होतील. तुमची महत्वकांक्षा वाढेल. कार्यक्षेत्रात नवनवीन कल्पना तुमच्या डोक्यात येतील. वरिष्ठांकडून त्याचे कौतुक होईल. आर्थिक आवक वाढेल. उत्पन्नात वाढ झाल्याने लाइफस्टाइलमध्ये सुधारणा होईल. त्रिपुष्कर योगात तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळाल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. घरातील वातावरण आनंदी राहील.
मकर राशीसाठी त्रिपुष्कर राजयोग शुभ लाभदायी ठरणार आहे. स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा योग आहे. या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होईल. कार्यक्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळेल. तुमच्या नेतृत्वगुणाचे कौतुक होईल. याकाळात तुमचे व्यक्तिमत्व आणखी खुलून येईल. व्यापारात स्पर्धकांवर मात कराल. नव्या डील तुमच्या पदरात पडतील. सिंगल लोकांची एखाद्या खास व्यक्तीसोबत भेट घडून येऊ शकते. भावंडांसोबत असलेले वादविवाद संपुष्ठात येतील. घरामध्ये एखाद्या महागड्या वस्तूंची खरेदी कराल.
कुंभ राशीच्या लोकांना त्रिपुष्कर योगात नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. तुमच्या आयुष्यात आनंद देणाऱ्या काही घटना घडतील. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या आरोग्याच्या तक्रारी नाहीशा होतील. मन आणि आरोग्य प्रसन्न राहील. व्यवसायिकांना आज नव्या संधी प्राप्त होतील. त्यातून व्यवसाय विस्तारण्यास मदत होईल. तुम्हाला कमाईचे नवे मार्ग खुले होतील. अनपेक्षित मार्गाने धनलाभ होईल. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. ऐषारामी आयुष्य जगण्याकडे कल राहील. घरातील वातावरण खेळीमेळीचे असेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.
संबंधित बातम्या