Varshik Shani Gochar 2025: चैत्र महिन्यापासून म्हणजेच ३० मार्च २०२५ पासून शनी मेष राशीत आहे. तो वर्षभर मेष राशीतच राहणार आहे. जाणून घेऊ या याचा संपूर्ण १२ राशींवर वर्षभर काय परिणाम होणार आहे ते.
मेष राशीला शनी १२ वा आहे. या मुळे मेष राशीच्या जातकांना दाव्यात अपयश येण्याची शक्यता आहे. मनात अनेक प्रकारच्या चिंता निर्माण होणार आहेत. त्याच प्रमाणे जातकाला अस्वस्थता देखील येणार आहे. २९ मार्च २०२५ पासून मेष राशीला साडेसाती सुरू होत आहे.
वृषभ राशीला शनी ११ वा आहे. तुम्हांला जमीनजुमल्यात फायदा होणार आहे. तसेच तुम्हांला नोकरीत नव्या संधी प्राप्त होणार आहेत. तसेच तुमच्या कतृत्वाला वाव मिळणार आहे.
मिथुन राशीला शनी १० वा आहे. हा उद्योगधंद्यात स्पर्धा निर्माण करेल. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासापासून विचलित करणारा आहे. तसेच तो मनात शंका निर्माण करणारा आहे.
कर्क राशीला शनी ९ वा आहे. हा अध्यात्मापासून तसेच धार्मिक गोष्टींपासून दूर नेणारा आहे. तसेच तुमच्या जोडीदारापासून मिळणाऱ्या सुखापासून लांब नेणारा आहे.जे तुमचे अहित चिंतीतात त्यांच्यापासून तुम्हांला त्रास देणारा आहे.
सिंह या राशीला शनी ८ वा आहे. हा शारीरिक व्याधी आणि क्लेष देणारा आहे. तसेच तो मित्रांमध्ये गैरसमज निर्माण करणारा आहे. प्रवासात दगदग निर्माण करणारा आहे.
कन्या राशीला शनी ७ वा आहे. हा स्थावरात समस्या निर्माण करणारा आहे. मुलांसोबत मतभेद निर्माण करणारा आहे. तसेच तुमच्या वैवाहिक जीवनात कटकटी निर्माण करणारा आहे.
तूळ राशीला शनी ६ वा आहे. हा व्यापारात बचत करणारा आहे. तसेच तो मतभेद दूर करणारा असून वादात यश देणारा आहे.
वृश्चिक राशीला शनी ५ वा आहे. हा संततीला पीडा देणारा आहे. तसेच तो प्रवासात त्रास व दगदग देणारा आहे. हा विरोधकांना नमवणारा आहे.
धनु राशीला शनी ४ था आहे. हा मनात चिडचिड वाढवणारा आहे. तसेच तो व्यापारात नुकसान करणारा आहे. न्यायालयीन कामात अपयशाची भिती देणारा आहे.
मकर राशीला ३ रा शनी आहे. हा मित्रांमध्ये तुमचा मान वाढवणारा आहे. नोकरीत बदल घडवणारा आहे. तसेच तो स्वत:बद्दल आत्मविश्वास वाढवणारा आहे. २९ मार्च २०२५ पासून मकर राशीची साडेसाती संपत आहे.
कुंभ राशीला शनी २ रा आहे. हा नोकरीत शारीरिक आणि मानसिक कष्ट वाढवणारा आहे. स्थावर आणि जमिनीच्या व्यवहारात त्रास वाढवणारा आहे. सध्या महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. कुंभ राशीला आणखी अडीच वर्षे साडेसाती आहे.
मीन राशीला शनी १ ला आहे. हा मनात शंकाकुशंका आणि गैरसमज वाढवणारा आहे. भावंडांमध्ये वाद वाढवणारा आहे. पैशांची चिंता वाढवणारा आहे. मीन राशीला अजून ५ वर्षे साडेसाती सतावणार आहे.
शनी संपूर्ण वर्ष मीन राशीत आहे. म्हणून मीन राशीत असलेल्या मेष, सिंह, वृश्चिक, धनु, कुंभ आणि मीन या राशींना अनुक्रमे १२, ८, ५, ४, २, १ वा शनी आहे. हे लक्षात घेता या राशींच्चा जातकांनी खालील उपाय करावेत.
> या राशींच्या लोकांनी जप, हवन, दान, पूजा करावी. > पीडेचा परिहार करण्यासाठी दर शनिवारी अभ्यंगस्नान करावे, तसेच नित्य शनिस्त्रोत पठण करावे.
> शनिवारी शनीचे दर्शन घेऊन शनीला उदीड आणि मीठ अर्पण करावे.
> शनीला तेलाचा अभिषेक करावा.
> शनीला काळी फुले वाहावीत
> दर शनिवारी संध्याकाळपर्यंत उपोषण करून शनिमहात्म्य वाचावे.
> नित्य शनिस्त्रोत पठण करावे.
> शनि मंत्राचा २३ हजार वेळा जप करावा.
> नीलमण्याची अंगठी जवळ बाळगावी.
> शनीसाठी मारुतीची उपासना करावी.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या