कन्या राशीची वैशिष्ट्ये
कन्या ही स्वभावाशी संबंधित रास मानली जाते. या राशीचे चिन्ह म्हणजे हातात फुलांची फांदी असलेली मुलगी. या राशीचा स्वामी बुध आहे. कन्या राशीची दिशा दक्षिण आहे. या राशीची अक्षरे तो, पा, पी, पू, शा, ना, था, पे, पो अशी आहेत. हे पृथ्वी तत्वाचे राशी चिन्ह आहे. त्याचा शुभ रंग हिरवा आहे. भाग्यवान क्रमांक ५ आहे.
कन्या राशीच्या लोकांचा स्वभाव
कन्या राशीचे लोक साधारणपणे सभ्य आणि मृदुभाषी असतात. कोणत्याही प्रकारची अडचण आली की ते थोडे घाबरतात. कोणतेही काम व्यवस्थापन आणि नियोजन करून करण्यावर भर देतात. कन्या राशीचे लोक कोणावरही सहजासहजी विश्वास ठेवत नाहीत. स्वतःच्या कामावर लक्ष ठेवतात. ते शांत स्वभावाचे कुशल आणि व्यावहारिक लोक असतात. त्यांना कर्तव्याप्रति निष्ठा आवडते. कन्या राशीचे लोक विनाकारण भावनिक होत नाहीत. कन्या राशीचे लोक आपल्या मनातील गोष्टी सहसा कोणाशीही लवकर शेअर करत नाहीत. ते कुशाग्र बुद्धीचे असतात.
कन्या राशीच्या स्वामीनुसार गुण
कन्या राशीचा अधिपती ग्रह बुध आहे. बुध हा बुद्धी आणि स्मरणशक्तीचा कारक ग्रह मानला जातो. नियोजन आणि व्यवस्थापनासाठी देखील हा ग्रह कारक आहे. बुध हा सौम्य ग्रह आहे. त्यामुळं कन्या राशीच्या लोकांचा स्वभाव शांत असतो.
कन्या राशीचं चिन्ह
कन्या राशीचे प्रतीक म्हणजे हातात फुलाची फांदी असलेली मुलगी. कन्या राशीचे लोक शांत आणि सौम्य स्वभावाचे असतात.
कन्या राशीचे गुण
कन्या राशीचे लोक स्वभावाने व्यावहारिक आणि निष्ठावंत असतात. कोणतीही योजना आखताना सारासार विचार करतात. ते स्वभावानं दयाळू असतात. त्यांना कठोर परिश्रमाची आवड असते. इतरांच्या भावना समजून घेऊन त्यानुसार ते वागतात. त्यांचा स्वभाव थोडासा स्वार्थीही असतो. कन्या राशीचे लोक त्यांच्या कामाला प्राधान्य देतात.
कन्या राशीच्या त्रुटी
कन्या राशीचे लोक इतरांवर टीका करण्यास तत्पर असतात. लाजाळू स्वभावामुळं ते पटकन लोकांमध्ये मिसळत नाहीत.
कन्या राशीचं करियर
कन्या राशीचे लोक व्यवसाय, कला, सौंदर्य, चित्रपट क्षेत्र, मीडिया, व्यवस्थापन आणि अभ्यास आणि शिक्षणाच्या क्षेत्रात काम करण्यास प्राधान्य देतात. कन्या राशीच्या लोकांना प्रशासकीय सेवा, खाते, गणित, सॉफ्टवेअर अभियंते, प्रोग्रामर, चार्टर्ड अकाउंटंट, शेअर ब्रोकर, आर्थिक क्षेत्र, बँकिंग, गुंतवणूक बँकिंग यासह वकिली आणि न्यायदानाच्या क्षेत्रात काम करायला आवडते.
कन्या राशीचं आरोग्य
कन्या राशीच्या लोकांना वाताचे विकार, पोटाचा त्रास, पुरळ, हाडांच्या समस्या, बोलण्यात दोष, त्वचेची ऍलर्जी, छातीत अस्वस्थता, पाठदुखी, सांधेदुखी, स्पॉन्डिलायटिस, चिडचिड, कानाच्या समस्या तसेच पोटाशी संबंधित समस्यांचा त्रास होऊ शकतो.
कन्या राशीची मैत्री
कन्या राशीचे लोक खूप चांगले मित्र बनतात. ते हुशार, विनम्र, लाजाळू, गोड, दयाळू, संवेदनशील आणि खूप बोलके असतात. त्यामुळं त्यांच्याबरोबर राहणं खूप सोपे असतं. कन्या राशीची मैत्री दीर्घकाळ टिकते. वृषभ, मिथुन, सिंह, वृश्चिक, धनु, मकर आणि मीन राशीच्या लोकांशी त्यांची चांगली मैत्री असते.
कन्या राशीचं वैवाहिक जीवन
कन्या राशीचे लोक प्रेमाच्या बाबतीत कुशल आणि व्यावहारिक असतात. कन्या राशीच्या लोकांमध्ये इतरांना आनंदी ठेवण्याचा गुण असतो. वृषभ, कर्क, वृश्चिक आणि मकर राशीला ते अधिक आकर्षित करतात. प्रेमविवाहाच्या बाबतीत ते पुढं असतात. जोडीदाराची सर्वाधिक काळजी घेतात. त्यांना स्वत:चा जोडीदार स्वतः निवडायचा असतो. त्यात त्यांना इतरांची ढवळाढवळ सहन होत नाही.