वृश्चिक राशीचं वार्षिक भविष्य २०२५ - करियर, आरोग्य, प्रेमसंबंध आणि आर्थिक परिस्थितीचे अंदाज

नमस्ते

वृश्चिक तुम्ही

(October - November)

Scorpio Horoscope for 2025

वर्ष कसे जाईल?
२०२५ हे वर्ष वृश्चिक राशीच्या राशीच्या लोकांसाठी आर्थिक समृद्धी तसेच शुभ फलप्राप्ती देणारं ठरणार आहे. विशेषत: करिअर आणि बिझनेस या दोन्हीमध्ये मे महिन्यानंतर तुमची प्रगती होईल.

प्रेम आणि नातेसंबंध
तुमचं जवळच्या नातेसंबंधांत तुम्हाला सुख मिळेल. उत्साही राहाल. तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक किंवा ऐतिहासिक स्थळाला भेट द्यायची असेल तर यश मिळेल.

करिअर आणि आर्थिक स्थिती
२०२५ हे वर्ष तुमच्या नोकरीसाठी चांगले राहील आणि तुम्हाला तुमच्या नोकरीत फायदेही मिळतील. कामाचा ताण नक्कीच वाढेल पण त्यामुळं तुमची चांगली प्रगती होईल.

आरोग्य
२०२५ मध्ये आरोग्याच्या बाबतीत फारशी समस्या येणार नाही. परंतु मार्चमध्ये हृदय आणि फुफ्फुसांशी संबंधित जुन्या समस्या पुन्हा उद्भवू शकतात.

चांगला महिना
मे महिन्यात नोकरीच्या बाबतीत सर्व काही व्यवस्थित होईल, उत्पन्न वाढेल.

संकटाचा महिना
मार्च, एप्रिल महिन्यात शारीरिक व्याधी उद्भवू शकतात.

वृश्चिक

वैशिष्ट्येसुसंगत
  • वृश्चिक राशीची वैशिष्ट्ये

    वृश्चिक ही राशीचक्रातील आठवी रास आहे. ही एक स्त्री रास आहे. राशीचं चिन्ह विंचू असून ते जल तत्वाचं प्रतिनिधित्व करतं. वर्ण ब्राह्मण, प्रकृती पित्त आणि प्रभाव रात्री असतो. या राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीची दिशा उत्तर आहे. या राशीची अक्षरे तो, ना, नी, नू, ने, नो, या. ना, ई, यू अशी आहेत. या राशीमध्ये विशाखा नक्षत्राचा चौथा चरण, अनुराधा आणि ज्येष्ठ नक्षत्राच्या सर्व चरणांचा समावेश होतो. या राशीचे देवता श्री हनुमान आणि भगवान श्री राम आहेत.
  • वृश्चिक राशीच्या लोकांचा स्वभाव

    वृश्चिक राशीचे लोक कडक स्वभावाचे असतात. वृश्चिक राशीचे लोक भावनिक आणि संवेदनशील असतात. हे लोक रहस्यमय स्वभावाचे असतात. आपली गुपितं लपवून ठेवतात. कष्टाला घाबरत नाहीत. कठोर परिश्रमानं जीवनात स्थैर्य निर्माण करतात.
  • राशीच्या स्वामीनुसार गुण

    वृश्चिक राशीचा प्रमुख ग्रह मंगळ आहे. मंगळाच्या स्वभावानुसार वृश्चिक राशीचे लोक कुशाग्र, शिस्तप्रिय, कठोर परिश्रम करणारे, संघर्षपूर्ण, आत्मविश्वासपूर्ण जीवन जगणारे आणि उच्च दर्जाची प्रशासकीय क्षमता असलेले असतात. शोधक प्रवृत्तीचे असतात.
  • वृश्चिक राशीचे चिन्ह

    वृश्चिक राशीचे चिन्ह विंचू आहे.
  • वृश्चिक राशीचे गुण

    वृश्चिक राशीचे लोक धाडसी, धैर्यवान, जिद्दी, खरे मित्र, भावनिक आणि हुशार स्वभावाचे असतात.
  • वृश्चिक राशीच्या त्रुटी

    मंगळाचे वर्चस्व असल्यामुळे वृश्चिक राशीचे लोक लवकर रागावतात. संशयास्पद स्वभावाचे असल्यानं त्यांचं नुकसानही होतं. एखाद्या गोष्टीवरून त्यांचा विश्वासही लवकर उडतो.
  • वृश्चिक राशीचं करियर

    वृश्चिक राशीच्या लोकांची कारकीर्द मुख्यत्वे प्रशासकीय सेवा तसेच अभ्यास आणि शिक्षणाच्या क्षेत्रात असते. याशिवाय हेरगिरी, पोलीस, लष्करी क्षेत्र, व्यवस्थापन आणि वैद्यक क्षेत्रात संशोधक म्हणून ते आपले भविष्य घडवतात. वृश्चिक राशीचे लोक व्यवसायातही यशस्वी होतात. सेल्स मार्केटिंग, अकाउंटिंग, हॉटेल मॅनेजमेंट, मानव संसाधन, राजकारण तसेच वकिली ही क्षेत्रे देखील त्यांच्यासाठी उत्तम ठरतात. वृश्चिक राशीचे लोक बहुमुखी प्रतिभेने संपन्न असतात आणि त्यांचा अनेक क्षेत्रात प्रभाव असतो.
  • वृश्चिक राशीचं आरोग्य

    कामात खूप व्यग्र असल्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांची पचनशक्ती कमकुवत असते. संसर्गजन्य आजार पटकन होतात. विसराळूपणाचाही त्यांना आजार असतो. रक्त आणि गुप्त विकारांच्या तक्रारी असतात. त्यांना सर्दी, बद्धकोष्ठता, सांधेदुखी, गाठी, ल्युकोरिया, फोड येणे, घशाचा त्रास, हृदय व पोटाचा त्रास होतो.
  • वृश्चिक राशीची मैत्री

    वृश्चिक राशीचे लोक मित्र म्हणून सामान्य असतात. त्यांना त्यांच्या ध्येयानुसार मैत्री करायला आवडते. कामात व्यग्र असल्यामुळं ते मित्रांना जास्त वेळ देऊ शकत नाहीत. कमी मित्र असले तरी मैत्री टिकवण्याची त्यांची क्षमता खूप चांगली असते. वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर आणि मीन राशीच्या लोकांशी चांगली मैत्री असते.
  • वृश्चिक राशीचं वैवाहिक जीवन

    वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या जोडीदाराच्या बाबतीत सौम्य स्वभावाचे असतात. प्रेमसंबंधांच्या बाबतीत ते पुढे असतात. वैवाहिक जोडीदाराशी त्यांचे चांगले संबंध असतात. वृषभ, कर्क, सिंह, मकर आणि मीन यांच्याशी चांगले संबंध असल्यामुळे ते चांगले जोडीदार निवडतात. वृश्चिक राशीचा माणूस जोडीदार म्हणून जवळजवळ सर्वच राशींशी संबंध ठेवू शकतो. वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या जीवनात त्यांच्या जोडीदाराचा किंवा इतर कोणाचाही हस्तक्षेप सहन करत नाहीत.

तुमच्या प्रियजनांचे भविष्य जाणा