धनु राशीची वैशिष्ट्ये
धनु ही काळपुरुषाच्या कुंडलीतील नववी राशी आहे. या राशीचे चिन्ह धनुर्धारी असून त्यामागे घोड्याचे शरीर आहे. या राशीचा स्वामी ग्रह गुरू आहे. धनु राशीची दिशा पूर्व आहे. या राशीची अक्षरे ये, यो, भा, भी, भु, धा, फा, धा, भे अशी आहेत. या राशीमध्ये मूल आणि पूर्वाषाधा नक्षत्राचे सर्व चरण आणि उत्तराषाध नक्षत्राचा पहिला टप्पा येतो. ही अग्नी तत्वाची राशी आहे. या राशीची देवता श्री हरी विष्णू आहे. देवींमध्ये माता लक्ष्मी कमला आणि माता सिद्धिदात्री आहेत.
धनु राशीच्या लोकांचा स्वभाव
धनु राशीचे लोक स्पष्ट आणि उदार स्वभावाचे असतात. संस्कृतीचा आदर करण्याबरोबरच, बौद्धिक आणि सर्जनशील कार्याची त्यांना आवड असते. बहुतेकांना प्रवास करणे देखील आवडते.
स्वामीनुसार धुन राशीचे गुण
धनु राशीचा स्वामी ग्रह गुरू आहे. गुरू हा ज्ञान, अध्यात्म, धर्म, बौद्धिकता, धार्मिक संस्था आणि संस्कृतीचा कारक असल्यामुळे धनु राशीच्या लोकांना शिक्षण, अभ्यास आणि संस्कृती या क्षेत्रात विशेष रस असतो. त्यांचा शिकण्याकडे जास्त कल असतो.
धनु राशीचं चिन्ह
धनु राशीचे चिन्ह धनुर्धारी आहे, ज्याच्या मागे घोडा आहे. त्यामुलं धनु राशीचे लोक नेहमी सत्याच्या शोधात असतात आणि त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक असतो.
धनु राशीचे गुण
धनु राशीचे लोक स्वभावाने धाडसी आणि उदार असतात. त्यांना संस्कृती आणि बौद्धिक सर्जनशील कार्यांमध्ये विशेष रस असतो. स्पष्टवक्ते असल्यानं अनेकदा टीकेचा विषयही बनतात. ते उदार मनाचे असतात. नेहमी स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करतात. निसर्गप्रेमी असतात. त्यांच्या निर्भय स्वभावामुळे ते त्यांचं कार्य सहज पार पाडतात. निष्ठावंत आणि तत्वज्ञानी असतात.
धनु राशीच्या त्रुटी
अतिआत्मविश्वासामुळं कधी कधी धनु राशीच्या लोकांचं नुकसान होतं.
धनु राशीचं करियर
धनु राशीचे लोक बहुमुखी प्रतिभेने संपन्न असतात. त्यांना विज्ञान, गणित, वाणिज्य आणि अकाउंट्समध्ये विशेष रस असतो. प्रशासकीय सेवेतही ते मोठे यश मिळवतात. याशिवाय नाट्यकला, ललित कला, व्यवस्थापन, हॉटेल मॅनेजमेंट, स्पीकिंग बिझनेस आणि वकिलीमध्ये ते खूप चांगले यश मिळवतात. अभ्यास आणि शिक्षण हे क्षेत्रही त्यांच्यासाठी अनुकूल क्षेत्र आहे.
धनु राशीचं आरोग्य
धनु राशीवर गुरूचा प्रभाव अधिक असल्यामुळं शरीरातील मांसल भाग वाढतो. त्यामुळं गॅसची समस्या वाढते. पोटाचा त्रास, ताप, मलेरिया, आगीची भीती यासारख्या तक्रारी असतात. हाडांच्या समस्या, विशेषत: स्पॉन्डिलायटिस, धनु राशीच्या लोकांसाठी खूप त्रासदायक असतात. यकृत, पित्ताचे खडे, कावीळ हे विकारही निर्माण होतात.
धनु राशीची मैत्री
मित्र म्हणून धनु राशीचे लोक खूप उबदार मनाचे असतात. एकमेकांच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेतात. धनु राशीचे लोक आपल्या मित्रांच्या इच्छेची खूप काळजी घेतात. सकारात्मक दृष्टीकोन असल्याने मित्र म्हणून सकारात्मक असतात. मेष, मिथुन, सिंह, कन्या, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांशी त्यांची चांगली मैत्री असते.
धनु राशीचे जोडीदार
जोडीदार म्हणून धनु राशीच्या लोकांचा दृष्टिकोन खूप सकारात्मक असतो. ते आपल्या जोडीदाराची सर्व काळजी घेतात. धनु राशीचे लोक निष्ठावंत आणि प्रामाणिक जोडीदार असल्याचं सिद्ध करून दाखवतात.