तूळ राशीची वैशिष्ट्ये
तूळ ही राशीचक्रातील सातवी रास आहे. तूळ राशीमध्ये वायू तत्वाचे वर्चस्व आहे. त्याचा अधिपती ग्रह शुक्र आहे. मुख्य देवता श्री हरी विष्णू व माता लक्ष्मी ब्रह्मचारिणी देवी आहे. या राशीचं चिन्ह तराजू आहे. तूळ राशीची दिशा पश्चिम आहे. तर अक्षरे ती रा, रि, रु, रे, रो, ता, ति, तू, ते ही आहेत. राशीत चित्रा नक्षत्राचे तिसरे आणि चौथे चरण, स्वाती नक्षत्राचे सर्व चरण आणि विशाखा नक्षत्राचे पहिले, द्वितीय आणि तृतीय चरण आहेत.
तूळ राशीचा स्वभाव
तूळ राशीच्या लोकांचे वागणं समतोल असतं. ते वाद मिटवण्यात कुशल असतात. ते न्यायिक वृत्तीचे असतात. निष्पक्षपणे संघर्ष करून ते आपलं ध्येय साध्य करतात. कलात्मक गुणांनी परिपूर्ण असतात. सामाजिक व्यक्तिमत्वाने समृद्ध असतात. संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करतात. रणनीतीकार राजनैतिक आणि राजनैतिक क्षेत्रात यशस्वी होतात. नम्र स्वभावाचे असतात. ते त्यांच्या कृतींबद्दल खूप संवेदनशील असतात, इतरांचा आदर करणे हे त्यांचा मूलभूत स्वभाव असतो.
तूळ राशीचे स्वामीनुसार गुण
तूळ राशीचा शासक ग्रह शुक्र आहे. शुक्र कला, प्रेम, सौंदर्य, नशीब, आकर्षण आणि भौतिकवाद याचा कारक मानला जातो. यामुळं तूळ राशीचे लोक चांगले संगीतकार आणि कलाप्रेमी असतात. त्यांच्यात कलात्मकता आणि बौद्धिकता खूप असते. तूळ राशीच्या लोकांमध्ये कोणतेही ज्ञान प्राप्त करण्याची क्षमता असते. हे लोक आदर्शवादी स्वभावाचे आणि समंजस असतात.
तूळ राशीचं चिन्ह
तूळ राशीचं चिन्ह तराजू आहे. हे न्यायाचं प्रतीक आहे. तूळ राशीच्या लोकांना न्याय आवडतो आणि ते न्यायिक क्षेत्रात ते अधिक सक्रिय असतात.
तूळ राशीचे गुण
तूळ राशीचे लोक इतरांची काळजी घेणारे, स्वभावाने नम्र, दयाळू, प्रामाणिक, प्रेमळ न्याय करणारे, निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक पैलूचे विश्लेषण करणारे, त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना मदत करणारे, सामाजिक, स्वभावाने लवचिक तसेच रागावणारे असतात.
तूळ राशीच्या त्रुटी
भिडस्त आणि संकोची स्वभावामुळे ते त्यांच्या भावना व्यक्त करू शकत नाहीत. भावनिकदृष्ट्या कमकुवत असतात. तूळ राशीचे लोक आपल्या निर्णयावर ठाम नसतात तर परिस्थितीनुसार बदलतात. कोणत्याही कामाच्या परिणामाची जास्त काळजी करतात. कोणावर जास्त विश्वास ठेवत नाहीत.
तूळ राशीचं करियर
तूळ राशीच्या लोकांना कला क्षेत्रात अधिक रस असतो. लेखन क्षेत्राची त्यांना आवड असते. अभियांत्रिकी क्षेत्रात चांगले यश मिळवण्याबरोबरच तूळ राशीचे लोक चांगले लेखक, संगीतकार, इंटिरियर डिझायनर, समीक्षक, प्रशासक असतात आणि त्यांना अभ्यास, अध्यापन, वकिली आणि न्याय या क्षेत्रात जायला आवडते.
तूळ राशीचं आरोग्य
तूळ राशीचे लोक त्यांच्या आरोग्याबाबत अधिक संवेदनशील असतात. किडनीच्या समस्या, लघवीच्या समस्या, पोटाच्या समस्या, त्वचेच्या समस्या, संसर्गाच्या समस्या, लठ्ठपणाच्या समस्या, अस्वस्थता, चिडचिड, सर्दी, खोकला, ऍलर्जी, कावीळ आणि यकृताच्या त्रासाला व त्या संबंधित आजारांचा त्यांना सामना करावा लागतो.
तूळ राशीची मैत्री
तूळ राशीचे लोक मनमिळावू आणि मित्र बनवण्यास तत्पर असतात, म्हणूनच त्यांना बरेच मित्र असतात. तूळ राशीचे लोक एकटे राहण्यापेक्षा लोकांसोबत राहणे पसंत करतात. मेष, मिथुन, कर्क, कन्या, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांशी त्यांची चांगली मैत्री असते.
तूळ राशीचा जोडीदार
तूळ राशीचे लोक मैत्री आणि प्रेमाच्या बाबतीत साधे असतात, परंतु वैवाहिक आयुष्य सुरू करण्यास अनेकदा उशीर करतात. ते आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ असतात.