सिंह राशीचं वैषिष्ट्य
सिंह राशीला स्थिर राशी मानले जाते. या राशीचे चिन्ह सिंह आहे. या राशीचा शासक ग्रह सूर्य आहे. सिंह राशीची दिशा पूर्व आहे. सिंह राशीची अक्षरे मा, मी, मु, मीन, मो, टा, ती, टू, ते आहेत. या राशीत माघ आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्राच्या सर्व चरणांसह, उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा पहिल्या चरणाचा समावेश होतो. हे अग्नि तत्वाचे चिन्ह आहे. सिंह राशीची देवता सूर्यदेव आहे. हे पुरुष राशीचे चिन्ह आहे. या राशीचा अनुकूल रंग लाल आहे.
सिंंह राशीच्या लोकांचे स्वभाव
सिंह राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास आणि स्वाभिमानाची भावना प्रखर असते. या राशीचे लोक जे काही नियोजन करतात, ते शांतपणे पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करतात. या राशीचे लोक बुद्धिमान, सहानुभूतीशील, जुन्या पुराणमतवादी विचारांचे अनुयायी, आशावादी, परोपकारी, दयाळू, दूरदृष्टी असलेले, उत्साही आणि आकर्षक असतात. त्यांना जास्त बोलण्याचीही सवय असते. ज्येष्ठांचा आदर करणे आणि राजकारणात रस घेणे हे त्यांच्यात ठळकपणे आढळतात.
सिंह राशीच्या स्वामीनुसार गुण
सिंह राशीचा शासक ग्रह सूर्य आहे. सूर्य हा आत्म्यासाठी जबाबदार ग्रह मानला जातो. हा एक बलवान आणि अग्नि प्रबळ ग्रह आहे. त्याचा माणसाच्या व्यक्तिमत्वावर जास्त प्रभाव पडतो. सिंह राशीचे लोक स्वभावाने आक्रमक आणि विश्वासार्ह असतात. त्यांच्या स्वभावात फारशी लवचिकता आणि अनिश्चितता नसते. कल्पनेच्या भराऱ्या मारण्याऐवजी जमिनीवर पाय रोवून काम करण्यास ते प्राधान्य देतात. योजना आखण्यात आणि व्यवस्थापनात ते कुशल असतात.
सिंह राशीचं चिन्ह
सिंह राशी कुंडलीतील पाचवी राशी आहे. या राशीचे चिन्ह सिंह आहे. सिंह हे आक्रमकतेचे प्रतीक मानले जाते. जो आपले ध्येय साध्य करण्यात पूर्णपणे यशस्वी होतो. भगवान विष्णू ही या राशीची आवडती देवता आहे.
सिंह राशीचे गुण
सिंह राशीचे लोक सर्जनशील आणि मदत करणारे, उदार मनाचे, उबदार मनाचे, आनंदी आणि विनोदी स्वभावाचे असतात. त्यांच्याकडे प्रशासकीय क्षमता खूप आहे. ते हुकूमत गाजवणारे आणि प्रखर व्यक्तिमत्त्वाचे असतात.
सिंह राशीच्या त्रुटी
आक्रमक स्वभावामुळं सिंह राशीचे लोक कधीकधी गर्विष्ठ होतात. इतरांनी आपलं कौतुक करत राहावं असं त्यांना वाटतं.
सिंह राशीचं करियर
सिंह राशीचा शासक ग्रह सूर्य आहे. सूर्य हा पिता, शासन व्यवस्था आणि आत्मा यांचा कारक ग्रह मानला जातो. सिंह राशीचे लोक सरकारी नोकरीत जाणे पसंत करतात. या राशीचे लोक प्रशासकीय सेवेत काम करण्यास प्राधान्य देतात. याशिवाय त्यांना राजकारण, सामाजिक क्षेत्र, कृत्रिम दागिने, महिलांचे कपडे, बुटीक, रेडिमेड कपडे, इलेक्ट्रॉनिक फिल्म मीडिया, रेस्टॉरंट्स, हिरे व्यापार, पर्यटन व्यवसाय आवडतात.
सिंह राशीचं आरोग्य
सिंह राशीचे लोक ताणतणावग्रस्त असतात. त्यामुळं त्यांना हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि हाडांचे आजार होतात. डोळ्यांना संसर्ग, पाय दुखणे, फ्लू, घसा खवखवणे, जडपणा आणि शरीरात वेदना यासारख्या तक्रारींनी हे लोक त्रस्त असतात.
सिंह राशीची मैत्री
या राशीचे लोक समाजाभिमुख असतात. सिंह राशीचे लोक विश्वासार्ह, शक्तीशाली, धैर्यवान, स्वभावाने एकनिष्ठ आणि अतिशय मनमिळावू असतात. त्यामुळं त्यांची मैत्री खूप चांगली मानली जाते. मैत्रीत ते चुका करणं टाळतात. त्यामुळं त्यांना मित्र खूप असतात.
सिंह राशीचं वैवाहिक जीवन
सिंह राशीचे लोक त्यांच्या जोडीदाराबद्दल अधिक जाकरूक असतात. प्रेमाचं सार्वजनिक प्रदर्शन करत नाहीत. सिंह राशीचे लोक त्यांच्या जोडीदारासाठी समर्पित असतात. वैवाहिक जीवनात परस्पर विश्वासात अडथळे आल्यास त्यांना लगेच राग येतो. मेष, वृषभ, मिथुन, वृश्चिक, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांशी त्यांचे चांगले संबंध असतात.