Marathi Varsik Rashi Bhavishya 2025 for India: सन २०२५ हे वर्ष भारतासाठी कसे जाईल हे ज्योतिषीय नजरेतून पाहणे महत्त्वाचे आहे. ग्रहमानानुसार भारताचे नव्या वर्षाचे भविष्य कसे असेल हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. देशात विविध क्षेत्रात अनेक घडामोडी घडणार आहेत. एकूण परिस्थितीचा विचार करता आपला देश अनिश्चिततेतून जाण्याची अधिक शक्यता आहे. मात्र असेल असले तरी कितीही संकटे आली तरी त्या संकटांवर मात करून भारत पुढे प्रगती करेल असे दिसते. इतकेच नाही तर भारताची प्रगती अशी होईल की जगाचे लक्ष देशाच्या प्रगतीकडे वेधले जाईल. या वर्षात भारताचे सामर्थ्य वाढेल. या सामर्थ्यामुळे आणि वाढलेल्या शक्तीमुळे विरोधक असलेले देश भारताशी सौम्य धोरण स्वीकारतील असे दिसते. आंतरराष्ट्रीय शांततेसाठी भारत पुढाकार राहणार आहे. राष्ट्रांतर्गत नेतृत्वास अनेक मोठा संघर्ष करावा लागेल असे दिसतंय.
नव्या वर्षाचा विचार करता देशाची आर्थिक स्थिती कशी असेल याचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सन २०२५ हे वर्ष आर्थिकदृष्ट्या चांगले जाईल. या वर्षात भारताची आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच देशाच्या परकीय चलनात वाढ होणार आहे. एकंदरीत हे वर्ष भारताला अनुकूल आणि प्रगतीचे जाईल यात शंका नाही.
नव्या वर्षात पावसाचे मान समाधानकारक राहणार आहे. मात्र, असे असले तरी पावसाचे मान अनिश्चित असल्याचे दिसते. देशाच्या काही भागांमध्ये पावसाची स्थिती चिंताजनकही असू शकेल. उत्तरेकडील काही भागांमध्ये पाऊस तितकासा पडणार नाही. मात्र, देशातील बहुतेक ठिकाणी वेळच्यावेळी आणि पुरेसा पाऊस पडेल. त्यामुळे पिके चांगली येतील. देशात काही पिकांचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. जसे उसाचे पिक कमी येण्याची शक्यता आहे. एकंदरीत धान्याचे उत्पादन समाधानकारक असेल. मात्र या बरोबरच धान्याची नासाडी होण्याचीही शक्यता आहे.
नवीन वर्ष हे कारखानदारांना आणि व्यापाऱ्यांना फारसे चांगले जाणार नाही. छोटे कारखानदार आणइ उत्पादकांना विशेष सवलती देण्यात येतील. तसेच त्यांच्या मालास बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. त्याच प्रमाणे देशात नोकरीपेक्षा स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याकडे देशातील तरुणांचा कल दिसेल. त्याच प्रमाणे बुद्धिवादी लोकांना संघर्ष करावा लागेल.
देशातील भूगर्भ संपतीकडे देशाचे विशेष लक्ष जाईल. नव्या वर्षात भूगर्भसंपत्ती अधिकाधिक मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. देशाचे खनिजतेलाचे उत्पादन वाढेल. देशातील शेतकरी वर्गावर काही संकटे येऊ शकतात.
नवे वर्ष अर्ध सरल्यानंतर देशभरात संपाची स्थिती निर्माण होईल. आंदोलनादरम्यान घेराव देखील घातले जातील. देशातील वातावरण अस्थिर बनेल. इतकेच नाही, तर देशात जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासेल. तसेच चैनीच्या वस्तूंची मागणी वाढेल. विविध पक्षांच्या नेतेमंडळींमध्ये संघर्ष निर्माण झालेला दिसेल. देशात वादळे देखील येतील. तसेच अपघात देखील पाहायला मिळतील. भूकंपाचे धक्के देखील जाणवतील. तसेच घातपाताची शक्यता देखील नाकारता येत नाही.
नवीन वर्षात मित्रराष्ट्राचे भारताचे संबंध कसे असतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या वर्षी मित्रराष्ट्र भारताशी सहानुभूतीने वागतील. ही राष्ट्रे भारताला विरोध करणार नाहीत. पाकिस्तान, चीन अशा भारतविरोधी राष्ट्रांमध्ये अंतर्गत वादळे येतील. काही शेजारच्या देशांमध्ये सत्तांतर होणार आहे. शेजारची राष्ट्रे कुरापती काढतील. सीमातंट्यांशी संबंधीत वाटाघाटीचे रुपांतर वादात होण्याची शक्यता आहे.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या