Varshik Bhavishya by Current Age: ज्योतिषीय गणितानुसार आपल्या चालू वयावर आधारित आपले भविष्य जाणता येते. आपल्या वयामध्ये काही संख्या मिळवून. तसेच त्या संख्येचा भागाकार करून जी शिल्लक येते त्या नुसार जातकाच्या वर्षभराच्या भविष्य जाणता येते. त्यानुसार जाणून घेऊ या.
१९४७ या संख्येत चालू वयाची बेरीज करावी. त्यानंतर आलेल्या संख्येत ३ मिळवून येणाऱ्या संख्येला १२ या संख्येने भागावे. जर शिल्लक ३ ही संख्या उरली तर तुमचे आप्तवर्ग आणि स्नेही यांच्याशी तुमचे खटके उडतील. अशा वेळी तुम्ही जपून वागावे. तुमच्या कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. मनाला स्वास्थ्याचा लाभ होणार नाही. जे काही तुम्हाला मिळवायचे आहे ते तुम्हाला मोठ्या कष्टाने मिळवावे लागेल.
१९४७ या संख्येत चालू वयाची बेरीज केल्यानंतर आलेल्या संख्येत ३ ही संख्या मिळवा. त्यानंतर येणाऱ्या संख्येला १२ ने भागल्यानंतर तर बाकी १ किंवा ६ या संख्या उरल्या तर तुम्हाला व्यवसायात थोडा फायदा होईल. मंगलकार्यात आणि धार्मिक कार्यांमध्ये तुमचा पैसा होईल. तुमचा आळसही वाढेल. तुमचा मानमरातब वाढेल.
वरील सख्येनुसार जर शिल्लक २ किंवा ८ उरले तर तुम्ही तुमच्या मनात योजलेल्या गोष्टी सिद्ध होतील. अपमानाचे प्रसंग उद्भवतील. तुमचा खर्च वाढत राहील. स्थावर व जंगममध्ये भानगडी होतील. तुम्हाला कौटुंबिक सुख चांगले मिळेल.
वरील संख्येनुसार जर शिल्लक ५ अगर ७ उरल्यास तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल असे दिसतंय. योग्य प्रयत्न केल्यास तुम्हांला परीक्षेमध्ये यश मिळेल.
जर या संख्येत शिल्लक शुन्य किंवा ९ उरली तर तुम्हाला शत्रूपासून वरचेवर त्रास होईल. तसेच तुम्हाला शेतीत नुकसान होईल. तुम्हाला उद्योगधंद्यात यश येईल.
तसेच जर शिल्लक ४ किंवा १० उरले तर तुमची धंद्यात प्रगती होईल. तुम्हाला एखादा प्रवासही घडेल. द्रव्यखर्च अधिक होईल. तसेच तुम्हाला सुख लाभेल.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या