Shani Rashifal 2025: शनीला कर्मदाता म्हटले जाते. शनीच तुम्हाला तुमच्या कर्मांचे फळ देतो. शनी केवळ माणसाला त्याने केलेल्या कर्मांचेच फळ देतो, म्हणून त्याला न्यायाधीश असेही म्हणतात. आता तब्बल ३० वर्षांनंतर शनी कुंभ राशीत आलेला आहे. सध्या शनी कुंभ राशीत वक्री होत आहे. त्यानंतर १५ नोव्हेंबरला शनी मार्गी होईल आणि पुढील वर्षी २०२५ मध्ये शनी मार्चमध्ये राशी परिवर्तन करेल. जाणून घेऊ या, शनीच्या या राशी परिवर्तनाचा कोणत्या राशींवर काय परिणाम होईल ते...
ज्योतिषाचार्य पंडित दिवाकर त्रिपाठी यांच्या म्हणण्यानुसार, सन २०२५ मध्ये शनिदेव राशी परिवर्तन करत आहेत. मार्चमध्ये शनी मीन राशीत भ्रमण करणार आहेत. या बदलाचा परिणाम प्रामुख्याने ८ राशींवर होणार आहे.
शनिदेव पुढील वर्षी मार्च महिन्यात मीन राशीत भ्रमण करत आहेत. याचा परिणाम वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींवर होणार आहे. या ८ राशींवर होणार हा परिणाम सकारात्मक असून शनीचे हे राशी परिवर्तन या ८ राशीसाठी विशेष फायदेशीर ठरणार आहे. या राशींसाठी परिस्थिती बदलेल. या लोकांना पूर्वी ज्या समस्यांना सामोरे जावे लागणार होते, आता ते त्यापासून मुक्त होतील. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. आर्थिक लाभाची चांगली चिन्हे आहेत.
सध्या मीन, कुंभ आणि मकर राशीवर शनी देवाची साडेसाती चालत आहे. याशिवाय शनीच्या ढैय्या (अडीच वर्ष) प्रभाव वृश्चिक आणि कर्क राशीवर आहे. शनी मीन राशीत जात असल्याने साडेसातीची स्थितीही बदलेल. शनीची साडेसाती साडेसात वर्षांची आणि ढैय्या अडीच वर्षांची आहे.
शनीचे मीन राशीत संक्रमण झाल्याने शनीची साडेसाती मकर राशीत संपुष्टात येईल. सध्या यावर शनी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. याशिवाय शनीची साडेसाती मेष राशीत सुरू होईल.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.