Yearly Guru Gochar 2025: गुरुच्या राशीबदलाचा काय होईल परिणाम? जाणून घ्या गुरुबलाचे राशीनुसार काय मिळणार फळ
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Yearly Guru Gochar 2025: गुरुच्या राशीबदलाचा काय होईल परिणाम? जाणून घ्या गुरुबलाचे राशीनुसार काय मिळणार फळ

Yearly Guru Gochar 2025: गुरुच्या राशीबदलाचा काय होईल परिणाम? जाणून घ्या गुरुबलाचे राशीनुसार काय मिळणार फळ

Dec 29, 2024 02:28 PM IST

Yearly Guru Gochar 2025: दैनंदिन जीवनात गुरुबल महत्त्वाचे मानले जाते. नव्या वर्षात गुरु कोणत्या राशींना शुभफळ देणार किंवा कोणत्या राशींना गुरुबल आहे आणि कोणत्या राशींसाठी गुरुबळ नाही हे पाहू या.

 गुरुच्या राशीबदलाचा काय होईल परिणाम? जाणून घ्या गुरुबलाचे राशीनुसार काय मिळणार फळ
गुरुच्या राशीबदलाचा काय होईल परिणाम? जाणून घ्या गुरुबलाचे राशीनुसार काय मिळणार फळ

Varshik Guru Bal Fal: चैत्र महिन्याची सुरुवात रोजी होत आहे. चैत्रमासारंभापासून ते १४ मे २०२२५ या कालावधीत गुरू वृषभ राशीत असणार आहे. याचे प्रत्येक राशीला काय फळ मिळते ते पाहू या.

मेष

मेष या राशीला दुसरा गुरू शालेय जीवन, महाविद्यालय किंवा उच्च शिक्षणात प्रगती करणारा आहे.

वृषभ

वृषभ या राशीला पहिला गुरू हा प्रवासात त्रास देणार आहे. तसेच काहीशी हानी देखील करणारा आहे.

मिथुन

मिथुन या राशीला गुरू हा १२ वा असून या राशीला गुरुबल नाही. यामुळे १२ वा गुरू मिथुन राशीची मानहानी करणारा आहे.

कर्क

कर्क या राशीला ११ वा गुरु आहे. हा गुरु नोकरीत फायदा मिळवून देणारा ठरणार आहे. या राशीला सध्या गुरुबल आहे.

सिंह

सिंह या राशीला गुरु १० वा आहे. हा गुरू व्यवसायात थोडी काळजी वाढवणारा आहे.

कन्या

कन्या या राशीला गुरु ९ वा आहे. यामुळे या राशीला धार्मिक कार्यात यशप्राप्ती होणार आहे. सध्या या राशीला गुरुबल आहे.

तूळ

तूळ या राशीला गुरु ८ वा आहे. मात्र या राशीला सध्या गुरुबल नाही. या काळात या राशीच्या जातकांच्या आरोग्याच्या समस्या वाढणार आहेत.

वृश्चिक

वृश्चिक या राशीला ७ वा गुरु आहे. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरवणारा हा ७ वा गुरु आहे. सध्या वृश्चिक राशीला गुरुबल आहे.

धनु

धनु या राशीला गुरु ६ वा आहे. हा गुरु भागीदारीमध्ये वाद निर्माण करून देणारा आहे. धनु या राशीला सध्या गुरुबल नाही.

मकर

मकर या राशीला गुरु ५ वा आहे. हा गुरु शिक्षणात प्रगती करून देणारा आहे. सध्या मकर राशीला गुरुबल आहे.

कुंभ

कुंभ या राशीला गुरु ४ था आहे. हा गुरु व्यवसायात अपयश देणारा आहे. सध्या कुंभ या राशीला गुरुबल नाही.

मीन

मीन या राशीला गुरु ३ रा आहे. हा गुरु व्यवसायात कष्ट देणारा ठरणार आहे.

१५ मे २०२५ ते १८ ऑक्टोबर २०२५ - तसेच ५ डिसेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत गुरु मिथुन राशीत आहे. पाहू या १२ राशींना गुरु काय फळ देईल.

मेष

मेष या राशीला तिसरा गुरू आहे. हा गुरु भागिदारीच्या व्यवहारात, तसेच शेतीत भानगडी निर्माण करणारा आहे.

वृषभ

वृषभ या राशीला दुसरा गुरू आहे. हा गुरु घरात मंगलकार्य घडवणारा आहे. त्याच प्रमाणे हा व्यवसायात यश देणारा आहे. सध्या या राशीला गुरुबल आहे.

मिथुन

मिथुन या राशीला गुरू हा पहिला असून हा गुरु संततीबद्दल काळजी करायला लावणारा आहे. तसेच तो शिक्षणात आर्थिक अडचणी आणणारा आहे.

कर्क

कर्क या राशीला १२ वा गुरु आहे. हा गुरु आप्तेष्टांकरवी त्रास देणारा आहे. तसेच हा गुरु नोकरीत मानहानी देणाराही आहे. सध्या कर्क या राशीला गुरुबल नाही.

सिंह

सिंह या राशीला गुरु ११ वा आहे. हा गुरु तुमच्या नोकरी-धंद्याचा व्याप वाढवणारा आहे. विद्यार्थ्यांना बक्षिस मिळवून देणारा आहे. सध्या सिंह या राशीला गुरुबल आहे.

कन्या

कन्या या राशीला गुरु १० वा आहे. हा गुरु प्रवासाचा आणि वाहनाचा खर्च वाढवणारा आहे. त्याच प्रमाणे हा मित्रांमध्ये वाद निर्माण करणारा आहे.

तूळ

तूळ या राशीला गुरु ९ वा आहे. हा गुरु घरात धार्मिक कार्य घडवणारा आहे. हा गुरु यात्रेचा योग जुळवून आणणारा आहे. सध्या या राशीला गुरुबल आहे.

वृश्चिक

वृश्चिक या राशीला ८ वा गुरु आहे. हा गुरु आरोग्य बिघडवणारा आहे. तुमच्या व्यवसायात हा मानसिक त्रास वाढवणारा आहे. सध्या वृश्चिक राशीला गुरुबल नाही.

धनु

धनु या राशीला गुरु ७ वा आहे. हा गुरु कौटुंबिक सुख देणारा आहे. तसेच तुमचे निर्णय योग्य ठरवणारा आहे. सध्या धनु या राशीला सध्या गुरुबल आहे.

मकर

मकर या राशीला गुरु ६ वा आहे. हा गुरु स्थावर मालमत्तेत अडचणी आणि भानगडी निर्माण करणारा आहे. दाव्यात अपयश आणणारा आहे. सध्या मकर राशीला गुरुबल नाही.

कुंभ

कुंभ या राशीला गुरु ५ था आहे. हा गुरु व्यवसायात कीर्ती वाढवणारा आहे. हा लांबचे प्रवास घडवणारा आहे. सध्या कुंभ या राशीला गुरुबल आहे.

मीन

मीन या राशीला गुरु ४ था आहे. हा गुरु संसारात दुरावा निर्माण करणारा आहे. व्यवसायात कष्ट देणारा, मिळकत कमी करणारा आहे.

१८ ऑक्टोबर २०२५ ते ५ डिसेंबर २०२५ पर्यंत गुरु कर्क राशीत असणार आहे. पाहू या या काळात १२ राशींना काय फळ मिळेल.

मेष

मेष या राशीला ४ था गुरू आहे. हा गुरु व्यापारात नुकसान करणारा आहे. तसेच तो मालमत्तेत वाद वाढवणारा आहे. या काळात मेष राशीला गुरुबल नाही.

वृषभ

वृषभ या राशीला तिसरा गुरू आहे. हा गुरु अभ्यासाचे दडपण वाढवणारा आहे. शेतीत गुंता निर्माण करणारा आहे.

मिथुन

मिथुन या राशीला गुरू हा दुसरा असून हा गुरु व्यवसायातील उत्पन्न वाढवणारा आहे. मिथुन राशीला गुरुबल आहे.

कर्क

कर्क या राशीला गुरु पहिला आहे. हा गुरु मुलाबाळांचे प्रश्न सोडवण्यात अपयश देणारा आहे.

सिंह

सिंह या राशीला गुरु १२ वा आहे. हा गुरु नोकरीत कष्ट देणारा आहे. सध्या सिंह या राशीला गुरुबल नाही.

कन्या

कन्या या राशीला गुरु ११ वा आहे. हा गुरु विद्यार्थ्यांना अभ्यासात यश देणारा आहे. सध्या सिंह या राशीला गुरुबल आहे.

तूळ

तूळ या राशीला गुरु १० वा आहे. हा गुरु महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकणारा आहे. तसेच तो मित्रांमध्ये वाद घडवून आणणारा आहे.

वृश्चिक

वृश्चिक या राशीला ९ वा गुरु आहे. हा गुरु देवदर्शनासाठी प्रवास घडवणारा आहे. त्याच प्रमाणे तो आस्तिकता वाढवणारा आहे. सध्या वृश्चिक राशीला गुरुबल आहे.

धनु

धनु या राशीला गुरु ८ वा आहे. हा गुरु व्यवसायात अडचणी आणणारा आणि भावंडांमध्ये वाद निर्माण करणारा आहे. सध्या धनु या राशीला सध्या गुरुबल नाही.

मकर

मकर या राशीला गुरु ७ वा आहे. हा गुरु कौटुंबिक सौख्य देणारा आहे. तसेच हा गुरु शिक्षणात प्रगती करणाराही आहे. सध्या मकर राशीला गुरुबल आहे.

कुंभ

कुंभ या राशीला गुरु ६ वा आहे. हा गुरु भागिदारीत भांडणे देणारा आहे. तसेच तो आरोग्याच्या समस्या निर्माण करणारा आहे. सध्या कुंभ या राशीला गुरुबल नाही.

मीन

मीन या राशीला गुरु ५ था आहे. हा गुरु व्यवसायात अर्थप्राप्ती करून देणारा आहे. तसेच तो लांबचे प्रवास देखील घडवणारा आहे. सध्या मीन राशीस गुरुबल आहे.

गुरु अनिष्ट असेल तर काय उपाय करावेत?

ज्या राशींना गुरु शुभफळ देतो अशा राशींना गुरुबल असते. मात्र ज्या राशींना गुरुबल नाही, अशांनी प्रत्येक गुरुवारी उपवास करावा. तसेच श्री दत्तात्रेयास अभिषेक करावा. नित्य गुरुचरित्र वाचावे. एखाद्या गुरुवारी गुरुपीडा परिहार करण्यासाठी सांगितलेले दान करावे. गुरुमंत्राचा १९ हजार वेळा जप करावा. तसेच पुष्कराजाची अंगठी जवळ बाळगावी. श्री, दत्तात्रेयाचे दर्शन घ्यावे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner