चांदी हा धातू अत्यंत शुभ धातू म्हणून हिंदू धर्मात मानला गेला आहे. हत्ती हा प्राणीही शुभतेचं प्रतीक आहे. सहाजिकच जेव्हा दोन शुभ गोष्टी एकत्र येतात, तेव्हा काहीतरी चांगलंच घडतं. चांदीचा हत्ती घरात चांगली बातमी आणतो, पैशाची समस्या दूर करतो, यशाची दारे उघडतो. संपत्ती वाढवतो. परस्पर संबंधात गोडवा आणतो. चांदीच्या हत्तीमुळे घरात धार्मिकता आणि पवित्रतेचे वातावरण निर्माण होते. वास्तुशास्त्रात हत्तीला घरासाठी अत्यंत भाग्यवान मानलं गेलं आहे. घराच्या उत्तर दिशेला चांदी्च्या हत्तीची मूर्ती ठेवल्याने घरात सुख, शांती आणि ऐश्वर्य वाढत असं मानलं जातं. यामुळे गणपती आणि माता लक्ष्मी या दोघांचा आशीर्वाद मिळतो असी मान्यता आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या