Astrology For Men Ear Pierce In Marathi : हिंदू धर्मात, आपल्या १६ विधींपैकी एक म्हणजे कान टोचणे. जर आपण प्राचीन काळाबद्दल बोललो तर, हिंदू धर्मात सर्व राजे आणि सम्राटांचा तसेच भगवान श्री राम आणि कृष्ण यांचासुद्धा वैदिक परंपरेनुसार कान टोचण्याचा विधी झाला होता, असे सांगितले जाते. तुमच्या लक्षात आले असेल की पूर्वीच्या काळी लहान मुलांचे लहानपणीच कान टोचत असत. कान टोचल्याने मेंदूमध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यास मदत होते आणि व्यक्ती बुद्धिमान बनते. त्यामुळे लहानपणीच मुलांचे कान टोचले जातात ज्यमुळे शिक्षण सुरू होण्यापूर्वीच मुलांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वाढते. चला जाणून घेऊया या मागचे ज्योतिषशास्त्र आणि फायदे.
भगवान रामाचेही कान टोचल्याचा उल्लेख पौराणिक ग्रंथांमध्ये आढळतो. याशिवाय पूर्वीच्या काळातील राजे-सम्राटांचेही कान टोचायचे. असे मानले जाते की ज्या पुरुषांचे कान टोचलेले असतात त्यांची विचार करण्याची क्षमता वाढते. बुद्धीचाही विकास होतो.
धार्मिक श्रद्धेनुसार, जर पुरुषांनी त्यांचे कान टोचले तर ते वाईट नजरेपासून स्वतःचे संरक्षण करू शकतात. वास्तविक, सोन्याचे किंवा तांब्याचे झुमके घातल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते, ज्यामुळे व्यक्ती पुन्हा पुन्हा आजारी पडत नाही आणि आरोग्य चांगले राहते.
ज्योतिष शास्त्रानुसार कान टोचल्याने कुंडलीतील राहू आणि केतू ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो. तसेच नऊ ग्रहांची स्थिती मजबूत होते. राहू-केतू बलवान झाल्यामुळे व्यक्तीला पैशाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो आणि समाजात त्याचा मान-सन्मान वाढतो.
कानाच्या खालचा भाग ( इअर लोब ) हा कानाचा सर्वात नाजूक भाग मानला जातो. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचे कान टोचले तर त्याचे मन शांत राहते. मनातील नकारात्मक विचारांपासून मुक्ती मिळते. याशिवाय कान टोचल्याने पुरुषांमध्ये शौर्य दिसून येते, ज्यामुळे त्यांचे मनोबल वाढते.
धार्मिक मान्यतांनुसार पुरुषांनीही स्त्रियांप्रमाणे त्यांचे दोन्ही कान टोचले पाहिजेत. पण आजच्या काळात बहुतेक मुलांचा एकच कान टोचला जातो, जे मान्यतेनुसार चुकीचे मानले जाते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या