Friday 13th Superstitions And Myths In Marathi : शुक्रवारी येणारी १३ तारीख अनेक ठिकाणी अशुभ मानली जाते. हा दिवस अशुभ का मानला जातो, यामागे काय समज आहे. ही कुप्रसिद्ध तारीख शतकानुशतके आपत्ती आणि दुर्दैवाशी संबंधित आहे का, जाणून घेऊया.
हिंदू पंचांगानुसार आज १३ तारीख शुक्रवार असून, प्रदोष व्रत आहे. तसेच सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे ज्यामुळे हा दिवस अशुभ असू शकत नाही. परंतू, शुक्रवार आणि १३ तारखेचा संयोग अशुभ मानला जातो हे सर्वांनाच माहीत आहे. १३ आकड्यालाही अशुभ मानले जाते, त्यामुळे या आकड्याशी संबंध येईल असे कोणतेच काम केले जात नाही.
नॉर्स पौराणिक कथांमध्येही १३ तारीख अशुभ मानली आहे. जसे हॉटेलमध्ये १३ नंबरची रूम, गाडीच्या नंबर १३ न ठेवणे, बिल्डिंगमध्ये १३वा मजला अशा गोष्टींसाठी लोक १३ आकडा वापरणे टाळतात. अनेक बिल्डिंगमध्ये १२ नंतर १४ वा मजला असतो. हॉलिवूडमध्ये या संबंधीत सिरीजही प्रदर्शित करण्यात आली आहे. अनेक जण १३ नंबर संबंधीत गोष्टी घेणे किंवा वापरणे घाबरतात. कारण १३ तारखेला अशुभ तारीख मानतात. खरंतर या मागचे खरे कारण फार कमी लोकांना माहिती आहे.
असे मानले जाते की शुक्रवार १३ तारखेचा संबंध येशू ख्रिस्ताशी आहे, जिथे यहूदा इस्करियोटने येशूचा विश्वासघात केला. हा जेवणाचा कार्यक्रम शुक्रवारी झाला, ज्यामध्ये १३ लोक उपस्थित होते आणि त्या दिवशी १३ तारीख होती आणि त्या व्यक्तीने येशू ख्रिस्त १३व्या खुर्चीवर बसलेले असताना त्यांच्यासोबत जेवण केले. त्यानंतरच येशूला क्रुसावर चढवण्यात आले. या घटनेमुळे शुक्रवार १३ तारखेला अशुभ मानले जाते.
प्राचीन रोमन मान्यतेनुसार शुक्रवारचा दिवस शुक्र देवीशी जोडल्यामुळे अशुभ मानला जातो. त्याच वेळी, इजिप्शियन लोकांचा असा विश्वास होता की १२ ही एक परिपूर्ण संख्या आहे, जी पूर्णता दर्शवते, परंतु १३ ही एक अनियमित आणि अपूर्ण संख्या आहे. या प्राचीन मान्यतांमुळे १३ तारखेचा शुक्रवार अशुभ मानला जातो.
शुक्रवार आणि १३ तारखेचा फ्रान्सशीही संबंध आहे. खरं तर, शुक्रवारी, १३ ऑक्टोबर, १३०७ रोजी, फ्रान्सचा राजा फिलिप याने शेकडो शक्तिशाली सैनिक, नाइट्स टेम्पलर यांना सामूहिक अटक करून फाशी देण्याचे आदेश दिले. या घटनेमुळे टेंपलर्सचा विश्वासघात झाला, ज्याने या दिवस आणि तारखेशी संबंधित दुर्दैव आणि आपत्तीसाठी अंधश्रद्धा आणखी मजबूत केली.
संबंधित बातम्या