वैदिक शास्त्रानुसार, अंकज्योतिष मानवी आयुष्यावर अगदी खोलवर प्रभाव टाकतात. राशीभविष्यप्रमाणेच अंकभविष्यातसुद्धा भविष्याचा अंदाज वर्तविण्यात येतो. मात्र अंक भविष्य केवळ भविष्यच सांगत नाही तर, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, त्याची गुणवैशिष्ट्ये,आवडी-निवडी याबाबतसुद्धा माहिती देते. त्यामुळेच अंक भविष्याला विशेष महत्व आहे. दैनंदिन आयुष्यात सर्वसामान्य लोकांपासून अगदी सेलिब्रेटींपर्यंत अनेक लोक अंकशास्त्राचा आधार घेतात. अनेक सेलिब्रेटीनीं आपला अंकशास्त्रावर प्रचंड विश्वास असल्याचं सांगितलं आहे.
अंकशास्त्रात मुलांकवरून भविष्य सांगितले जाते. व्यक्तीच्या जन्म तारखेवरुन हा मूलांक काढला जातो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची जन्म तारीख कोणत्याही महिन्याची १७ तारीख असेल. तर त्याच्या बेरजेवरुन त्या व्यक्तीचा मूलांक ८ असतो. राशीप्रमाणेच प्रत्येक मूलांकाचादेखील एक स्वामी ग्रह असतो. त्या ग्रहांच्या गुणधर्मांचा पूर्ण प्रभाव या मूलांकांवर पडत असतो. त्यामुळेच प्रत्येक मूलांकाचे गुणवैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. आज आपण अशा एका मूलांकाबाबत जाणून घेणार आहोत, ज्याच्यावर नेहमीच सूर्यदेवाची कृपादृष्टी असते. त्यामुळेच हे लोक अत्यंत बुद्धिमान आणि धनवान असतात.
अंकशास्त्रानुसार १ मूलांकाचे लोक अत्यंत नशीबवान आणि बुद्धीमान असतात. या मूलांकाचा स्वामी ग्रह सूर्य आहे. सूर्य ऊर्जा, बुद्धिमत्ता, तेजस्वीपणा, दृढनिश्चय, नेतृत्वगुण यांचा कारक मानला जातो. १ या मूलांकाच्या लोकांवर नेहमीच सूर्यदेवाची कृपादृष्टी असते. आणि त्यामुळेच या लोकांमध्ये सूर्याच्या गुणधर्मांचा प्रभाव दिसून येतो. नेतृत्वगुण असल्याने या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होते. लोकांकडून महत्वसुद्धा प्राप्त होते. यांचे व्यक्तिमत्व सूर्यासारखे तेजस्वी असते.
अंक शास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक १ असतो. १ मुलांकाचे लोक आयुष्यात कोणत्याच गोष्टीत माघार घेत नाहीत. मूलांक १ चे लोक अत्यंत धाडशी आणि धडाडीवृत्तीचे असलयाने, प्रगतीच्या मार्गात कोणताही धोका पत्करण्यास तयार असतात. या लोकांमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो. शिवाय यांच्यात उत्तम निर्णयक्षमता असता. आणि म्हणूनच हे लोक आपल्या निर्णयावर ठाम असतात. मूलांक १ च्या लोकांमध्ये उत्तम संवादकौशल्य असल्याने ते पटकन इतरांमध्ये मिक्स होऊन जातात. त्यांना इतर लोकांशी ओळख करून घेण्यात फारसा वेळ लागत नाही.
मूलांक १ च्या लोकांमध्ये सूर्यदेवाच्या कृपेने प्रचंड ऊर्जा असते. प्रत्येक कार्य हे लोक अगदी उत्साहाने करत असतात. शिवाय हे लोक अत्यंत बुद्धिमान असतात. आणि त्यामुळेच कोणत्याही बाबतीत प्रत्येक गोष्टीचा चहूबाजूंनी विचार करुनच पाऊल टाकत असतात. त्यामुळेच यांची फसगत होण्याची शक्यता कमी असते. हे लोक बुद्धी आणि कष्टाच्या जोरावर प्रचंड संपत्ती मिळवतात. आणि ऐषोरामी आयुष्य जगतात.
संबंधित बातम्या