Dream Interpretation : ही पाच स्वप्न पाहाणं मानलं जातं अत्यंत शुभ
Good Dreams According To Swapna Shastra : काही स्वप्न पाहाणं अशुभ मानलं जातं किंवा नकारात्मक घटनांची नांदी आयुष्यात घडणार असल्याचे संकेत काही स्वप्न देतात. तिथेच, काही स्वप्न पाहाणं अत्यंत शुभ मानलं जातं.
स्वप्न पाहाणं ही एक सर्वसामान्य प्रक्रीया आहे. रात्री झोपल्यावर सर्वजण स्वप्नं पाहातात.कधी एखादं भयानक संवप्न आपल्याला झोपेतुन खडबडून जागं करतं तर कधी एखादं मजेशीर स्वप्न आपल्याला पोट धरुन हसवतं. कधी एखादं गूढ आपल्याला विचार करायला भाग पाडतं तर कधी आपल्या आसपास झालेल्या घटनाही आपल्याला स्वप्नात पाहायला मिळतात. स्वप्न ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीची असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक स्वप्नाचा काहीतरी खास अर्थ दडलेला असतो असं स्वप्नशास्त्र सांगतं. आज आपण अशाच एका स्वप्नाबद्दल बोलणार आहोत. आज आपण अशी पाच स्वप्न पाहाणार आहोत जी पाहाणं अत्यंत शुभ मानलं जातं. कोणती आहेत ती पाच स्वप्न.
ट्रेंडिंग न्यूज
स्वप्नात मृत्यू पहाणे
स्वप्नात एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू पाहणे शुभ मानले जाते. याचा अर्थ त्या व्यक्तीचं वय वाढलं आहे असा होतो. तसेच आगामी काळात तुमचे त्यांच्याशी असलेले संबंध सुधारतील असाही याचा अर्थ होतो.
स्वप्नात फळझाडे पाहाणे
जर तुम्हाला स्वप्नात फळे किंवा फुलांनी भरलेली झाडे दिसली तर ते शुभ चिन्ह आहे. याचा अर्थ येत्या काही दिवसांत तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. यासोबतच तुमच्या आयुष्यात आनंदही येणार आहे. तिथे तुम्हाला कुठून तरी पैसे मिळू शकतात.
स्वप्नात पर्वत चढताना पाहाणे
स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात पर्वतावर चढणे शुभ मानले जाते. म्हणजे तुमची प्रगती होणार आहे. म्हणजे तुम्हाला कामाच्या ठिकाणी आणखी काही जबाबदारी मिळू शकते. यासोबतच व्यवसायातही फायदा होऊ शकतो.
स्वप्नात घुबड आणि पोपट पाहणे
स्वप्नात घुबड आणि पोपट दिसणे शुभ मानले जाते. कारण घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते. याचा अर्थ असा की तुम्हाला आकस्मिक किंवा अडकलेले पैसे मिळू शकतात. तसेच काही चांगली बातमी मिळू शकते.
स्वप्नात पाऊस पाहाणे
स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात पाऊस दिसला तर ते देखील एक शुभ चिन्ह आहे. याचा अर्थ कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळू शकतो. तसेच, तुमची कोणतीही योजना पूर्ण होऊ शकते. दुसरीकडे, स्वप्नात पाऊस पाहणे हे एक सुंदर जीवनसाथी मिळण्याचे संकेत देते.
(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)
विभाग