Shani Retrograde 2024 : शनी देवाच्या हालचालींमुळे प्रत्येक राशींवर शुभ-अशुभ परिणाम दिसून येत असतात. जोतिषशास्त्रानुसार, शनीला सर्वात शक्तिशाली ग्रहांपैकी एक समजले जाते. येत्या २९ जूनला शनी कुंभ राशीमधून वक्री चाल म्हणजेच उलट चाल चालणार आहेत. शनीच्या विक्री चालीचा काही राशींना जबरदस्त फायदा मिळणार आहे. या राशींचे आर्थिकदृष्ट्या नशीबच उघडणार आहे. मात्र काही राशी अशासुद्धा आहेत ज्यांच्यावर शनीच्या उलट चालीचा नकारात्मक प्रभाव पडणार आहे. शनीच्या वक्रीने या राशींना सर्वच क्षेत्रात आणि खाजगी आयुष्यात त्रास सहन करावा लागू शकतो. पाहूया या राशी नेमक्या कोणत्या आहेत. आणि त्यांच्यावर कोणते उपाय लाभदायक ठरतील.
येत्या २९ जूनला शनी कुंभ राशीतून आपली उलट चाल चालणार आहे. या चालीने राशीचक्रातील ४ राशींना नुकसानाची स्थिती निर्माण होणार आहे. मेष, मकर, कुंभ, मीन या चार राशींवर शनीच्या वक्री चालीचा काहीसा नकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. तब्बल ५ महिने शनीच्या वक्री चालीचा प्रभाव या राशींवर असणार आहे. याकाळात तुमच्या आर्थिक, शारीरिक, मानसिक आणि वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुमचा आत्मविश्वाससुद्धा कमी होऊ शकतो.
मात्र जोतिषशास्त्रात प्रत्येक अशुभ प्रभावापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही मार्ग आणि उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांचा अवलंब केल्याने होणारे त्रास बऱ्यापैकी कमी होतील. आणि अडचणीतून बाहेर पडण्यासाठी पुरेसा आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत मिळेल. या क्षेत्रातील तज्ञ, जोतिष यांचा योग्य सल्ला घेऊन हे उपाय केल्यास तुम्हाला याचा लाभ निश्चित दिसून येईल.
शनी देवाच्या अशुभ प्रभावापासून स्वतः चा बचाव करण्यासाठी आणि शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी शास्त्रात काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. त्यानुसार या राशीच्या लोकांनी नकारात्मक प्रभाव दूर करण्यासाठी प्रत्येक शनिवारी शनी देवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. मंदिरात तेल, काळी तीळ, आणि निळ्या रंगाचे पुष्प अर्पण करुन दोषमुक्तीची प्रार्थना करावी. निश्चितच तुम्हाला याचा लाभ मिळेल. शिवाय दररोज हनुमान चालीसा आणि शनी चालीसाचा जप केल्याने शनी देव प्रसन्न होतात.
तसेच शनिवारच्या दिवशी काळे कपडे, चप्पल, तेल,अन्नधान्य यांचे दान करावे. गरीब आणि गरजू व्यक्तींना अन्नदान करुन त्यांची सेवा केल्याने शनी देव प्रभावी होतात. त्याचबरोबर दररोज उडीद डाळीपासून बनलेल्या खिचडीचा आपल्या भोजनात समावेश करावा. आणि तिळाचे तेल अंगाला लावून स्नान करावे. यामुळे शनी दोषापासून बचाव होण्यास मदत होते.
संबंधित बातम्या