Lunar Eclipse: मार्चमध्ये वर्षाचे पहिले चंद्रग्रहण कधी होणार? भारतात पाहायला मिळणार की नाही, जाणून घ्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lunar Eclipse: मार्चमध्ये वर्षाचे पहिले चंद्रग्रहण कधी होणार? भारतात पाहायला मिळणार की नाही, जाणून घ्या

Lunar Eclipse: मार्चमध्ये वर्षाचे पहिले चंद्रग्रहण कधी होणार? भारतात पाहायला मिळणार की नाही, जाणून घ्या

Updated Feb 19, 2025 06:35 PM IST

Lunar Eclipse 2025 Date: वर्षातील पहिले चंद्रग्रहण मार्चमध्ये होणार आहे. जाणून घ्या भारतात काय दिसणार हे ग्रहण आणि त्याची वेळ-

मार्चमध्ये वर्षाचे पहिले चंद्रग्रहण कधी होणार? भारतात पाहायला मिळणार की नाही, जाणून घ्या
मार्चमध्ये वर्षाचे पहिले चंद्रग्रहण कधी होणार? भारतात पाहायला मिळणार की नाही, जाणून घ्या

Lunar Eclipse: वर्षातील पहिले चंद्रग्रहण (Lunar Eclipse) फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होणार आहे. हे चंद्रग्रहण १३-१४ मार्च २०२५ रोजी होणार आहे. हे ग्रहण रेड ब्लड मून असेल. नासाच्या वेबसाईटनुसार, चंद्रग्रहण १३ मार्चच्या रात्री आणि १४ मार्चच्या पहाटे जगातील काही भागात दिसेल. हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षातील पहिले चंद्रग्रहण सिंह आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात होणार आहे. जाणून घ्या, मार्च महिन्यातील चंद्रग्रहण कोणत्या देशांमध्ये दिसेल, वेळ आणि सूतक काळ भारतात मान्य असेल की नाही?

भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजून २७ मिनिटांनी चंद्रग्रहण सुरू होईल आणि १० वाजून ३९ मिनिटांनी ते संपेल. तसेच हे चंद्रग्रहण ११ वाजून ५६ मिनिटांनी संपेल.

भारतातून चंद्रग्रहण दिसणार की नाही?

हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. भारतात न दिसल्याने या चंद्रग्रहणाचा सूतक काळ देशात मानला जाणार नाही.

हे चंद्रग्रहण कुठून दिसेल?

नासाच्या वेबसाईटनुसार, हे चंद्रग्रहण उत्तर अमेरिका, पॅसिफिक महासागर, पश्चिम युरोप आणि पश्चिम आफ्रिकेत दिसणार आहे.

चंद्रग्रहणाच्या वेळी कोणती काळजी घ्यावी?

  • चंद्रग्रहणाच्या काळात देवी-देवतांच्या मूर्तींना हात लावू नये.
  • चंद्रग्रहणाच्या काळात कोणत्याही प्रकारची पूजा करू नये.
  • चंद्रग्रहणाच्या वेळी देवाच्या मंत्रांचा किंवा धार्मिक मंत्रांचा जप करावा.
  • चंद्रग्रहणाच्या काळात अन्न शिजवू नये. या काळात अन्न खाणेही टाळावे असे सांगितले गेले आहे. याचे कारण म्हणजे ज्योतीषास्त्रानुसार, चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीवर राहूचा प्रभाव वाढतो.
  • चंद्रग्रहणाच्या वेळी झोपणे टाळावे.
  • चंद्रग्रहण काळात कात्री, सुया, चाकू इत्यादी धारदार वस्तूंचा वापर करू नये.

(हे चंद्र ग्रहण भारतातून दिसणार नसल्याने चंद्र ग्रहणाच्या काळात हे नियम पाळावेत का या बाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यानुसार योग्य ते कार्य करावे.)

चंद्रग्रहण म्हणजे काय?

चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे. ज्याला धार्मिक आणि वैज्ञानिक असे दोन्ही महत्त्व आहे. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एकत्र येतात आणि चंद्र पृथ्वीच्या सावलीत जातो तेव्हा चंद्रग्रहण होते. पूर्ण चंद्रग्रहणात संपूर्ण चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या अंधाऱ्या भागात पडतो, ज्याला उंबरा म्हणतात. चंद्र उंबराच्या आत असतांना तो लालसर-केशरी दिसतो. या घटनेला ब्लड मून असेही म्हणतात.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Sunil Madhukar Tambe

eMail

Whats_app_banner