Astrological Prediction For Baramati Result: बारामती विधानसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळाली. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडून महायुतीत सहभागी झालेले अनुभवी अजित पवार विरुद्ध नवखे युगेंद्र पवार यांच्यात लढत होत आहे. युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. इथे कोण जिंकेल याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. मात्र, ज्योतिषीय गणनेनुसार इथे कोणाचा विजय होईल हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. पाहु या ज्योतिषाचार्य काय म्हणतात…
बारामती विधानसभा मतदारसंघातील कोण उमेदवार विजयी होईल याबाबत ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर गुरूजी यांनी भाकीत केले आहे. एका मराठी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत गुरूजी म्हणतात की, राज्यातील प्रमुख तीन नेते देवेंद्र फडणवी, उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचा योगायोगाने एकाच महिन्यातला, म्हणजेच जुलै महिन्यातला जन्म आहे. या तिन्ही नेत्यांचा रवी कर्क राशीत आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची कुंभ रास आहे. तर उद्धव ठाकरे यांची सिंह रास आहे. दोघांच्या कुंभ राशीत चंद्र आहे. यामुळे यांना साडेसातीचा त्रास सुरू आहे. तसेच रवीच्या अष्टमात शनी आहे. म्हणूनच या दोघांना खूप तडजोड करावी लागलेली आहे. मागे १०५ जागा येऊन देखील त्यांना मुख्यंत्रिपदापासून लांब रहावे लागले होते.
आता सुद्धा तशीच परिस्थिती आहे. म्हणूनच लोकसभेला त्यांना अपयश आलं. दुसरं अपयश म्हणजे त्यांना मनासारख्या जागा मिळणार नाहीत. या दोघांना गुरू चांगला आहे. वृषभ राशीचा गुरू रवीच्या ११ व्या स्थानी आहे . म्हणून त्यांना आशा आहे. बारामतीमध्ये लोकांनी आपलं स्थानिक नेतृत्व राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात पुढे यायला पाहिजे अशी भूमिका सतत घेतलेली आहे. मात्र या वेळी कदाचित अजित पवार यांना सहानुभुती मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार बारामतीमधून निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आहे.
ज्या क्षणाला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फुटला, तो काळ नजिकचा आहे. त्यामुळे सहाजिकच सहानुभुती शरद पवार यांनाच मिळेल असं दिसतंय. त्यांची ज्येष्ठता आहे, त्यांनी केलेलं काम आहे. आतापर्यंत गेली ५०-६० वर्षे राजकारणात आहेत. तसेच त्यांनी ज्या प्रकारे बारामतीमध्ये काम केलंय, याच्या आधारावर लोक त्यांच्या मागे राहतील. तुलनात्मक दृष्टीने पाहिलं, तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळवू शकते.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.