Swapna Shastra : स्वप्नात स्वत:चं लग्न पाहाण्याचा काय असतो अर्थ?
Own Marriage In Dreams : लग्न या विषयावर प्रत्येकजण स्वप्नाळू असतो. आपलं लग्न व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र आपलं लग्न प्रत्यक्षात नाही तर स्वप्नात होताना पाहाण्याचा अर्थ काय असतो.
स्वप्न पाहाणं ही एक सर्वसामान्य प्रक्रीया आहे. रात्री झोपल्यावर सर्वजण स्वप्नं पाहातात.कधी एखादं भयानक संवप्न आपल्याला झोपेतुन खडबडून जागं करतं तर कधी एखादं मजेशीर स्वप्न आपल्याला पोट धरुन हसवतं. कधी एखादं गूढ आपल्याला विचार करायला भाग पाडतं तर कधी आपल्या आसपास झालेल्या घटनाही आपल्याला स्वप्नात पाहायला मिळतात. स्वप्न ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीची असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक स्वप्नाचा काहीतरी खास अर्थ दडलेला असतो असं स्वप्नशास्त्र सांगतं. आज आपण अशाच एका स्वप्नाबद्दल बोलणार आहोत.
ट्रेंडिंग न्यूज
आज आपण स्वप्नात स्वत:चं लग्न पाहाण्याचा अर्थ काय असतो याबद्दल बोलणार आहोत. लग्न या विषयावर प्रत्येकजण स्वप्नाळू असतो. आपलं लग्न व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र आपलं लग्न प्रत्यक्षात नाही तर स्वप्नात होताना पाहाण्याचा अर्थ काय असतो याची आज आपण माहिती घेणार आहोत.
स्वप्नात स्वत:चं लग्न पाहाणं का मानलं जात नाही शुभ?
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतो. अशा स्थितीत जर तुम्हाला स्वप्नात तुमचा विवाह होताना दिसत असेल तर अशा प्रकारचे स्वप्न शुभ मानले जात नाही. स्वप्नशास्त्रानुसार, या प्रकारचे स्वप्न तुमच्या भविष्यात घडणाऱ्या काही घटना दर्शवते.
स्वत:चं लग्न पुन्हा लग्न करताना पाहाण्याचा काय असतो अर्थ?
जर तुम्ही स्वप्नात स्वतःला पुन्हा लग्न करताना पाहिलंत तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात खुष नाही. तसेच, या प्रकारच्या स्वप्नाचा अर्थ भविष्यात तुमच्या वैवाहिक जीवनात काही बाधा येणार आहे असा होतो.
स्वप्नात स्वत:ची लग्नाची मिरवणूक पाहण्याचा काय असतो अर्थ?
स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात स्वतःच्या लग्नाची मिरवणूक पाहणे शुभ असते. अशा स्वप्नाचा अर्थ असा आहे की समाजात तुमचा आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. आगामी काळात तुमच्या सोशल नेटवर्कची व्याप्ती वाढेल, ज्यामुळे तुम्हाला आगामी काळात फायदे मिळतील.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)