Swapnashastra : स्वप्नात भूकंप पाहाण्याचा काय असतो अर्थ?
Dream & Their Meaning : स्वप्नात भूकंप पाहणं किंवा भूकंपाच्या धक्क्यांपासून स्वत:ला वाचवताना पाहाणं अशा स्वप्नांचा नेमका अर्थ काय असतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.
स्वप्न ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीची असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक स्वप्नाचा काहीतरी खास अर्थ दडलेला असतो असं स्वप्नशास्त्र सांगतं. आज आपण अशाच एका स्वप्नाबद्दल बोलणार आहोत. स्वप्नात भूकंप पाहणं किंवा भूकंपाच्या धक्क्यांपासून स्वत:ला वाचवताना पाहाणं अशा स्वप्नांचा नेमका अर्थ काय असतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.
ट्रेंडिंग न्यूज
भूकंपात स्वत:ला मरण पावल्याचं पाहाण्याचा काय असतो अर्थ?
हे स्वप्न तुम्हाला दोन प्रकारचे संकेत देते. पहिला की तुम्ही तुमची एखादी आवडती गोष्ट किंवा व्यक्ती गमावणार आहात आणि दुसरी म्हणजे तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टीला साध्य करण्यासाठी हव्या त्या स्तरापर्यंत जाऊन ती गोष्ट साध्य करू शकता. या दोन शक्यतां व्यतिरिक्त एखादी प्रिय गोष्ट गमावल्यावर पुन्हा एकदा ती गोष्ट साध्य केल्यावर जो आनंद मिळेल हे त्याचं प्रतीक असू शकतं.
भूकंपात स्वत:ला वाचवण्यासाठी पळत असल्याच्या स्वप्नाचा काय होतो अर्थ?
एखादी गोष्ट जी तुम्हाला त्रास देत आहे, त्यापासून तुम्ही तुमची सुटका करत आहात असा या स्वप्नाचा अर्थ होतो किंवा एखादा धावपटू ज्याप्रमाणे अडथळ्यांची शर्यत पार करतो अगदी त्याचप्रमाणे, तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या कठीण परिस्थितीवर मात करत जिंकण्याचा प्रयत्न करत आहात असा या स्वप्नाचा अर्थ होतो.
स्वप्नात भूकंपानंतरचा विनाश पाहाण्याचा काय असतो अर्थ?
भूकंपामुळे जीवन नष्ट होतं. भूकंपानंतरची शोकांतिका पाहणे ही सुद्धा मोठी शिक्षा आहे. अशी स्वप्ने पाहून झोप उडाली तर झोप परत येतच नाही. जर तुम्हालाही अशी स्वप्ने पडत असतील तर ते एखाद्या कामाबद्दल तुम्हाला असुरक्षित वाटत असल्याचाही संकेत असू शकतो, एखाद्या कामाबद्दल किंवा योजनेबाबत तुमच्या मनात कोणताही संभ्रम असेल तर त्याचा पुनर्विचार करा असं हे स्वप्न सांगतं.
भूकंपात तडा गेलेल्या भिंती पाहाण्याचा काय असतो अर्थ?
एखाद्या गोष्टीला आपण कधीही गमावू शकत नाही असा आत्मविश्वास असताना ती गोष्ट आपल्याला गमावू लागू शकते हे दाखवणारं हे स्वप्न आहे. भूकंपात तडा गेलेल्या भिंती स्वप्नात दिसल्या तर ते काही त्रासाचे लक्षण असू शकते. याची सकारात्मक बाजू म्हणजे तुम्हाला पडलेले हे स्वप्न नवीन संधी आणि सुरुवातीचे प्रतीक आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)