Guruvar Special : गुरु आणि विज्ञानाचा काय संबंध, याचा व्यास किती आहे, वाचा सविस्तर
Guru & Science : ज्या ग्रहाला चक्क गुरु असं म्हटलं आहे त्या गुरुविषयी काही माहितीही आपण घेऊया आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित माहितीही घेऊया.
हिंदू धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे काही कार्य करताना शुभ योग किंवा कुंडली पाहून, पंचांगातल्या शुभ मुहूर्तांनी ते कार्या सिद्धीस न्यायचं असतं. अगदी त्याचप्रमाणे काही कामं अशी असतात जी अमूक एका दिवशी करणंही तितकंच महत्वाचं असतं. आज गुरुवार आहे. मग गुरुवारी अशी कोणती कार्य आहेत जी केल्याने आपल्याला पुण्य लाभू शकतं, चला पाहूया.
ट्रेंडिंग न्यूज
गुरुवार भगवान श्रीविष्णूंना समर्पित वार आहे. मात्र ज्या ग्रहाला चक्क गुरु असं म्हटलं आहे त्या गुरुविषयी काही माहितीही आपण घेऊया आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित माहितीही घेऊया.
नवग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे गुरु
नवग्रहांमध्ये सर्वात श्रेष्ठ अशी ज्याची ख्याती आहे तो ग्रह म्हणजे गुरु. सूर्यानंतर आपल्या सौरमालेतला सर्वात मोठा ग्रह अशीही याची ओळख आहे. गुरु हा धनु आणि मीन राशीचा स्वामी आणि सूर्य, मंगळ आणि चंद्राचा मित्र अशीही गुरुची ओळख आहे. शुक्र आणि बुध हे शत्रू ग्रह आहेत, तर शनि आणि राहू समान ग्रह आहेत.गुरु आणि मंगळ एकत्र राशीत असल्यास त्या व्यक्तीची शक्ती वाढते. तर गुरुनं सूर्याशी युती केल्यास त्या व्यक्तीचा समाजात मानसन्मान वाढतो.
गुरुची प्रतीकं कोणती
ज्योतिषशास्त्रानुसार सोने, हळद, पिवळे चंदन, पीपळ, पिवळा रंग, हरभरा डाळ, पिवळी फुले, केशर, गुरु, पिता, पुजारी, शिक्षण आणि पूजा इत्यादी गुरुवारचं म्हणजेच गुरुचे प्रतीक मानले गेले आहे.
गुरु आणि विज्ञानाचा काय संबंध आहे
आपल्या सौरमालेतला दुसरा सर्वात मोठा ग्रह म्हणून सूर्याकडे पाहिलं जातं. शास्त्रानुसार, दीड लाख किलोमीटर इतका गुरुचा व्यास आहे. गुरु ग्रहाबाबत अशी माहिती आहे की, पृथ्वीच्या आकाराच्या १३०० पृथ्वी गुरुमध्ये ठेवता येऊ शकतील इतका मोठा गुरु ग्रह आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)