मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Swapna Shastra : स्वप्नात पाहिल्या या गोष्टी? मग चुकूनही इतरांशी करू नका शेअर

Swapna Shastra : स्वप्नात पाहिल्या या गोष्टी? मग चुकूनही इतरांशी करू नका शेअर

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
May 22, 2023 08:38 AM IST

Dreams Not To Share : काही स्वप्न अशी असतात जी कधीही इतरांशी शेअर करू नये. कारण इतरांशी ही स्वप्न शेअर केल्यास त्याचा विपरीत परिणाम तुमच्यावर होतो असं स्वप्न शास्त्र सांगतं.

कोणती स्वप्न इतरांशी शेअर करू नये
कोणती स्वप्न इतरांशी शेअर करू नये (HT)

स्वप्नशास्त्र आपल्याला त्या स्वप्नाचा अर्थ काय आहे हे समजावण्यास मदत करते. कोणती स्वप्न इतरांशी शेअर करू नये असतात जी कधीही इतरांशी शेअर करू नये. कारण इतरांशी ही स्वप्न शेअर केल्यास त्याचा विपरीत परिणाम तुमच्यावर होतो असं स्वप्न शास्त्र सांगतं. आज आपण अशीच काही स्वप्न पाहाणार आहोत जी शेअर केल्यास त्याचा चुकीचा परिणाम तुमच्यावर होऊ शकतो.

स्वप्नात स्वतःच मृत्यू पाहाणे

जर तुम्हाला स्वप्नात तुमचा मृत्यू दिसला किंवा दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू दिसला तर अशी स्वप्ने कोणाशीही शेअर करू नका. हे स्वप्न आगामी आनंदी काळाचं प्रतीक आहे असं मानलं जातं. मात्र या स्वप्नाला इतरांशी शेअर केल्यास घरात येणाऱ्या आनंदाला दृष्ट लागते असं सांगितलं जातं.

स्वप्नात पालकांना पाणी पाजणे

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही स्वप्नात तुमच्या आई-वडिलांना पाणी देत ​​असाल तर हे स्वप्न भविष्यात तुमची प्रगती होणार असल्याचं द्योतक आहे. जर तुम्ही हे स्वप्न इतरांसोबत शेअर केलं तर तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

स्वप्नात फळांनी भरलेली बाग पाहाणे 

जर स्वप्नात तुम्हाला फळांनी भरलेली बाग दिसली. तर तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकणार असल्याचे ते संकेत आहेत. मात्र हे स्वप्न इतरांशी शेअर केल्यास तोच लाभ नुकसानात परावर्तीत होतो असं स्वप्नशास्त्र सांगतं.

स्वप्नात चांदीचा कलश पाहाणे

माता वक्ष्मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे असा या स्वप्नाचा थेट अर्थ आहे. तुमचे वाईट दिवस आता सरले आहेत आणि तुमचे चांगले दिवस आता सुरू होत आहेत असा या स्वप्नाचा अर्थ होतो. मात्र हे स्वप्न इतरांशी शेअर केल्यास माता लक्ष्मीची अवकृपा तुमच्यावर होऊ शकते, असं स्वप्न शास्त्र सांगतं.

स्वप्नात देव पाहणे

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात देव दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच तुमच्या नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल. असे स्वप्न कोणाला सांगू नये, अन्यथा हाती आलेली संधी परत जाऊ शकते.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग