मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Palmistry : हातावरच्या 'या' रेषा स्पष्ट करतात तुम्हाला परदेशी प्रवासाचे योग आहेत की नाही

Palmistry : हातावरच्या 'या' रेषा स्पष्ट करतात तुम्हाला परदेशी प्रवासाचे योग आहेत की नाही

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
May 16, 2023 08:24 AM IST

Palmistry For Foreign Trips : आपल्या हातावरच्या रेषा अनेका आपल्या नशीबात काय मांडलं आहे याचा अंदाज देतात. परदेशी प्रवास करायचा असेल तर तुमच्या हातावरच्या रेषा कशा असल्या पाहिजेत याची माहिती आपण घेणार आहोत.

काय सांगतात हातावरच्या रेषा
काय सांगतात हातावरच्या रेषा (Pexels)

भविष्यशास्त्रात अनेक गोष्टींचा उल्लेख होतो. आपल्या नशीबात काय मांडलं गेलं आहे याचा आढावा भविष्यशास्त्र देतं. त्याचप्रमाणे आपल्या तळहातावरच्या रेषा आपल्याला आपल्या भविष्यात काय मांडलं गेलं आहे याचा आढावा देतात. हातावरच्या रेषा ओळखण्यासाठी हस्तरेषाशास्त्राचा वापर केला जातो. आज आपण अशाच काही हातावरच्या रेषांबद्दल बोलणार आहोत.

तळहातावरच्या रेषा आणि त्याद्वारे तुमच्या नशीबात कोणता योग आहे याची माहिती आपल्याला ज्योतिषी करून देताना पाहायला मिळतात. आज आपण परदेशी जाण्यासाठी आपल्या हातात कोणत्या रेषा असल्या पाहिजेत आणि त्या कुठून कुठे गेल्या पाहिजेत याची माहिती घेणार आहोत.

परदेशी जाण्यासाठी तळहातावर कोणत्या रेषा असाव्यात

जर एखाद्याच्या तळहातावरची रेषा जीवनरेषेतून बाहेर पडून भाग्यरेषा ओलांडून चंद्र पर्वताकडे जात असेल तर परदेश प्रवासाची संधी आहे. ही रेषा जितकी खोल आणि स्वच्छ असेल तितका परदेश दौरा यशस्वी होईल, असे मानले जाते.

हस्तरेषा शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर बुध पर्वतावरून एखादी रेषा निघून सूर्य पर्वतावर पोहोचत असेल, तर अशी व्यक्ती अनेक वेळा परदेश प्रवास करते.

दुसरीकडे चंद्राच्या पर्वतावरून बाहेर पडणारी तळहातातील एखादी रेषा शनीच्या पर्वताला भिडली असेल तर अशा व्यक्तीचे भाग्य विदेशात चमकते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग