What is a moon sign : चंद्र राशी म्हणजे काय? चन्द्र राशीचे तुमची रास ठरवण्यात काय महत्व आहे हे जाणून घ्या?
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  What is a moon sign : चंद्र राशी म्हणजे काय? चन्द्र राशीचे तुमची रास ठरवण्यात काय महत्व आहे हे जाणून घ्या?

What is a moon sign : चंद्र राशी म्हणजे काय? चन्द्र राशीचे तुमची रास ठरवण्यात काय महत्व आहे हे जाणून घ्या?

Jul 25, 2024 08:01 PM IST

moon sign and its importance : चंद्र राशी म्हणजे काय आणि प्रत्येक राशीसाठी त्याचा अर्थ काय आहे, हे या लेखातून जाणून घेऊ या.

Moon sign meaning in astrology. (Representative image).
Moon sign meaning in astrology. (Representative image).

राशिभविष्यात चंद्रराशीचे महत्व काय?

चंद्र राशी म्हणजे आपल्या जन्माच्या वेळी चंद्राची स्थिती. सूर्य राशी जशी तेजस्वी असते तरी चंद्र राशी ही शांत, भावनिक मानली जाते. चंद्र राशी ही दर अडीच दिवसांनी प्रत्येक राशीतून फिरत असते. तुमची चंद्र राशी ही तुमच्या आंतरिक इच्छां आणि आकांक्षांना मार्गदर्शन करत असते. तर या इच्छा आणि आकांक्षाचे जीवनात प्रत्यक्ष अवलंबन हे सूर्य राशीद्वारे केले जात असते.

तुमची चंद्रराशी ही तुमच्या सूर्यराशीला पूरक असते. सूर्याचा अर्थ तुम्ही स्वतःला जगासमोर जे सादर करता ते तर चंद्राचा अर्थ तुम्ही आत, मनात दडवून ठेवलेल्या गोष्टी असा होतो. चंद्र राशी म्हणजे तुमच्या भावना, इच्छा आणि खाजगीपण असते. या गोष्टी तुमच्या प्रियजनांनाच दिसणाऱ्या असतात.

व्यक्तिची चंद्र राशी ही त्याच्या सूर्य राशीपेक्षा अधिक महत्वाची असते असं बऱ्याच लोकांचं म्हणण आहे. चंद्र राशीत तुम्ही आपलं खरं आंतरिक जग, आपल्या वास्तव भावना लोकांपासून लपवून ठेवू शकता. चंद्र जरी ही ती जन्म कुंडलीचा सर्वात महत्वाचा भाग नसली तरी सूर्य आणि जन्म राशींसह ‘तीन मोठ्या' राशींपैकी ती एक मानला जाते.

चंद्र राशी तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिनिधित्व कसे करते?

चंद्र राशी ही कर्क राशीवर राज्य करते. म्हणून चंद्र राशी ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या कर्क राशीचे सुद्धा प्रतिनिधित्व करत असते. चंद्र राशी तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांमध्ये भावनिक सुरक्षिततेसाठी काय आवश्यक आहे आणि कौटुंबिक समस्या उदभवल्यास तुम्ही कसं व्यक्त होता, हे दर्शविते. तुमचे कौटुंबिक नातेसंबंध, तुम्हाला कशात सुरक्षितता वाटते हे चंद्र राशी दर्शवते. उदाहरणार्थ, जर तुमची चंद्र रास मिथुन असेल तर तुम्हाला समोर व्यस्त रस्त्याकडे पाहण्यासाठी बाल्कनीची आवश्यकता भासू शकते. जर तुमची चंद्र रास मीन असेल तर तुम्हाला एखाद्या निर्जन स्थळी राहणे आवडू शकते. तुम्ही कुठे रहायला हवे आणि कोणत्या प्रकारचे घर तुम्हाला राहण्यायोग्य असू शकते हे ठरवण्यासाठी चंद्रराशी उपयुक्त ठरते.

चंद्राच्या वेगवेगळ्या राशींचे वेगवेगळे महत्व असते. मकर राशीचे चंद्र खूप संयमी असतात. अचानक शांत होऊ शकतात. मेष राशीचे चंद्र नेहमी जिवंत, रसरशीत आणि अधीर असतात. ते प्रत्येकाला ऊर्जा देतात. परंतु जेव्हा एखादी गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे होत नाही तेव्हा ते लवकर निराश होतात.

Whats_app_banner