लवकर नीजे लवकर उठे
धनसंपदा त्याला लाभे.
असं आपल्याला आपले आजीआजोबा सांगत असत. रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे याला आयुर्वेद शास्त्रातही अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं आहे. वास्तुशास्त्रातही दीर्घकाळ झोपणं आरोग्याला नुकसान देणारं असल्याचं म्हटलं गेलं आहे. इतकंच काय वास्तुशास्त्रामध्ये कोणत्या दिशेला झोपावं याचेही काही नियम सांगण्यात आले आहेत. हे नियम काय आहेत ते पाहूया.
पुराणांपासून ते ज्योतिषशास्त्रापर्यंत असं सांगण्यात आलं आहे की, झोपताना दिशेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. नेहमी पूर्व किंवा दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपावे. यामुळे संपत्ती आणि वय वाढते. तसेच, कधीही पश्चिम आणि उत्तरेकडे तोंड करून झोपू नये. कारण असे केल्याने आजार वाढण्याची शक्यता असते असं सांगितलं जातं.
सूर्यास्तानंतर तीन तासांनी म्हणजे सुमारे तीन तासांनी झोपली पाहिजे. झोपताना तुमचे डोके भिंतीपासून किमान तीन हात दूर असले पाहिजे. संध्याकाळी झोपणे देखील शुभ मानले जात नाही. तसेच ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही.
अनेकांना सोफ्यावर किंवा खुर्चीवर बसून झोपण्याची सवय असते. आरोग्य आणि वास्तू या दोन्ही दृष्टिकोनातून ही गोष्ट चांगली नाही. पलंगावर बसून जेवणेदेखील अशुभ मानले जाते. झोपताना कपाळावर टिळाही लावू नये.
सकाळी अंथरुणावरून उठताना उजव्या बाजूने उठून अंथरुण सोडावे. अचानक अंथरुण सोडल्याने हृदयावर दबाव येतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. शास्त्रानुसार सकाळी उठल्यावर प्रथम नतमस्तक होऊन पृथ्वीला स्पर्श करावा, त्यानंतर पाय जमिनीवर ठेवावे. शास्त्राचा हा नियमही विज्ञानाच्या याच तत्त्वावर आधारित आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)