मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Palmistry : तुमच्या हाताच्या बोटांमधलं अंतर सांगतं तुमचं भविष्य

Palmistry : तुमच्या हाताच्या बोटांमधलं अंतर सांगतं तुमचं भविष्य

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
May 11, 2023 09:50 AM IST

तुमच्या दोन बोटात अंतर जास्त असल्यास तुमचं भविष्य काय असेल हे ज्योतिषशास्त्र सांगतं.

हस्तशास्त्र
हस्तशास्त्र (HT)

आपला हात आणि आपल्या हाताची बोटं ही शारीरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची असतात. आपल्याला रोजच्या कामांमध्ये ही बोटं आणि हाताचा खूप उपयोग होतो. ज्योतिषशास्त्रातही आपल्या हाताला खूप महत्व प्राप्त झालं आहे. आपल्या हातावरच्या रेषा आपलं भविष्य सांगतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं. हातावरच्या प्रत्येक रेषेचं ज्योतिषशास्त्रात महत्व सांगण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे दोन बोटांमधल्या अंतराबाबतही ज्योतिषशास्त्र किंवा हस्तरेषाशास्त्रात काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. काय आहेत या गोष्टी पाहूयात.

दोन बोटांमध्ये अंतर असल्यास तुमचं भविष्य काय असू शकतं हे आज आपण जाणून घेणार आहोत.

बोटांमधील अंतरावरून जाणून घ्या तुमचे भविष्य

सर्वात लहान बोट आणि अनामिका यात अंतर असल्यास

ज्या लोकांना सर्वात लहान बोट आणि अनामिका यांच्यामध्ये जास्त अंतर दिसते, अशा लोकांना वृद्धापकाळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या लोकांना आयुष्याच्या शेवटच्या दिवसातही त्रास सहन करावा लागतो.

अंगठा आणि तर्जनी यात अंतर असल्यास

ज्या लोकांचा अंगठा आणि तर्जनी यांच्यात अंतर असते, त्यांचे बालपण नेहमीच अडचणीत जाते. त्यांना आर्थिक खर्च उचलावा लागतो.

मधलं बोट आणि अनामिका यात अंतर असल्यास

मधले बोट आणि अनामिका यांच्यात सामान्यपेक्षा जास्त अंतर असेल तर अशा लोकांचे आयुष्य बहुतेक आर्थिक संकटातच जाते. या लोकांना खूप कष्ट केल्यावरच यश मिळते.

अनामिका सरळ आणि लांब असल्यास

अनामिका सरळ आणि लांब असेल तर अशी व्यक्ती पैशाच्या बाबतीत खूप भाग्यवान असते. त्यांना भरपूर धन-संपत्ती मिळते.

तळहाताच्या रेषेनुसार बोटांमध्ये जास्त अंतर नसणं हे अत्यंत चांगलं लक्षण मानलं जातं. ज्या लोकांच्या बोटांमध्ये अंतर नसतं त्यांना जीवनात सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel