Swapna Shastra : स्वप्नात कोणत्या गोष्टी पाहाणं असतात शुभ संकेत?
Dreams & their Meanings : काही स्वप्न अशी असतात जी तुम्हाला तुमच्या जीवनात सुख समृद्धी येणार असल्याचे संकेत देतात. अशी स्वप्न तुम्हालाही पडत असल्यास तुम्हाला लवकरच चांगले दिवस पाहायला मिळणार आहेत असा त्यांचा संकेत असतो.
स्वप्न पाहाणं ही एक सर्वसामान्य प्रक्रीया आहे. रात्री झोपल्यावर सर्वजण स्वप्नं पाहातात.कधी एखादं भयानक संवप्न आपल्याला झोपेतुन खडबडून जागं करतं तर कधी एखादं मजेशीर स्वप्न आपल्याला पोट धरुन हसवतं. कधी एखादं गूढ आपल्याला विचार करायला भाग पाडतं तर कधी आपल्या आसपास झालेल्या घटनाही आपल्याला स्वप्नात पाहायला मिळतात. स्वप्न ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीची असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक स्वप्नाचा काहीतरी खास अर्थ दडलेला असतो असं स्वप्नशास्त्र सांगतं. आज आपण अशाच एका स्वप्नाबद्दल बोलणार आहोत.
ट्रेंडिंग न्यूज
काही स्वप्न अशी असतात जी तुम्हाला तुमच्या जीवनात सुख समृद्धी येणार असल्याचे संकेत देतात. अशी स्वप्न तुम्हालाही पडत असल्यास तुम्हाला लवकरच चांगले दिवस पाहायला मिळणार आहेत असा त्यांचा संकेत असतो. आज स्वप्नात कोणत्या गोष्टी पाहाणं शुभ संकेत असल्याचं लक्षण असल्याचं सांगितलं जातं ते आपण पाहाणार आहोत.
स्वप्नात दिवा जळताना पाहाण्याचा काय असतो अर्थ?
स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात जळणारा दिवा पाहणे शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात.
स्वप्नात फळबागा किंवा फुलबागा पाहाण्याचा काय असतो अर्थ?
जर तुम्हाला स्वप्नात फळे किंवा फुलांनी भरलेली झाडे दिसली तर तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळणार आहे. तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे असा त्याचा अर्थ होतो.
स्वप्नात डोंगर चढताना पाहाण्याचा काय असतो अर्थ?
स्वप्नातील पुस्तकानुसार, जर तुम्ही स्वप्नात स्वतःला डोंगरावर चढताना पाहिले तर तुम्हाला लवकरच संपत्ती मिळेल. याशिवाय तुम्ही समस्यांमध्ये अडकले असाल तर त्या समस्यांपासूनही तुम्हाला आराम मिळतो असा त्याचा अर्थ होतो.
स्वप्नात गुलाबाचे फूल पाहाण्याचा काय असतो अर्थ?
स्वप्नात गुलाबाचे फूल पाहणे शुभ मानले जाते. गुलाबाचे फूल पाहिल्यास देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करते आणि तुम्हाला पैसे मिळू शकतात. याशिवाय जीवनात सकारात्मकता येणार आहे.
स्वप्नात तुटलेला दात पाहाण्याचा काय असतो अर्थ?
स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात तुटलेला दात पाहण्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला नवीन संधी मिळणार आहेत. याशिवाय तुम्हाला लवकरच भरपूर पैसे मिळणार आहेत असाही त्याचा अर्थ होतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)