मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Vastu Tips : तुळशीच्या रोपाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Vastu Tips : तुळशीच्या रोपाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Mar 13, 2023 06:19 PM IST

Vastu Tips For Tulsi Plants : ज सकाळी पूजा करताना तुळशीच्या रोपाचीही पूजा केली जाते. मात्र वास्तुशास्त्रानुसार काही दिवस असे आहेत जेव्हा तुळशीला जल अर्पण करु नये हे तुम्हाला माहिती आहे का.

तुळशीचं रोप
तुळशीचं रोप (हिंदुस्तान टाइम्स)

हिंदुू धर्मात तुळशीला फार महत्व आहे. तुळशीच्या वनस्पतीचे आयुर्वेदीक गुण आपल्या साऱ्यांनाच माहिती आहेत. अशात घरोघरी तुळशीचं रोप पाहायला मिळतं. रोज सकाळी पूजा करताना तुळशीच्या रोपाचीही पूजा केली जाते. मात्र वास्तुशास्त्रानुसार काही दिवस असे आहेत जेव्हा तुळशीला जल अर्पण करु नये हे तुम्हाला माहिती आहे का. आज आपण याच विषयावर माहिती घेणार आहोत.

तुळशीला कधी जल अर्पण करू नये

वास्तुशास्त्रानुसार दर रविवारी, एकादशी आणि सूर्य आणि चंद्रग्रहणाच्या वेळी तुळशीला जल अर्पण करू नये. तसेच या दिवसात आणि सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडू नयेत. असे केल्याने दोष येतो. वास्तूनुसार, जो व्यक्ती गुरुवारी तुळशीच्या रोपामध्ये कच्चे दूध टाकतो आणि रविवार सोडून दररोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावतो, त्याच्या घरात लक्ष्मीचा वास असतो.

कोरड्या तुळशीचं रोप घरात नसावं

याशिवाय कोरड्या तुळशीचे रोप कधीही घरात ठेवू नये. हे अशुभ मानले जाते. असे रोप विहिरीत किंवा पवित्र ठिकाणी टाकून नवीन रोप लावावे. तुळशीच्या रोपाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींबद्दल वास्तुशास्त्रातील ही चर्चा होती. या वास्तु टिप्सचा अवलंब करून तुम्ही नक्कीच याचा लाभ घ्याल अशी आशा आहे.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

WhatsApp channel

विभाग