thumb palmistry news marathi : प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारामागे त्याचं भाग्य, भविष्य आणि नशीबाची माया असते. अनेकांना त्यांच्या आयुष्यात मोठं यश मिळतं. तसेच सुख-समृद्धी, धन आणि समाजात मानसन्मान मिळतो. परंतु काही लोकांना यातलं काहीच मिळत नाही. त्यामुळं ते सतत निराशाग्रस्त होत असतात. परंतु तुमच्या आयुष्यात काय घडणार आहे, हे तुम्हाला हातावरील रेषांवरूनही समजत असतं. तुमच्या हातावर M चिन्हं असेल तर तुम्ही अन्य लोकांपेक्षा जास्त नशीबवान आणि धनवान असतात. असं म्हटलं जातं की, हातावर M असणाऱ्या लोकांना संपूर्ण जीवनात कधीही कोणत्याही गोष्टींची कमतरता भासत नाही. अतिशय सुख-समृद्धीने आणि आनंदाने ते आयुष्य जगतात.
हस्तरेषा शास्त्रानुसार, ज्या लोकांच्या तळहातावर M रेषा असते, ते लोक कधीही त्यांच्या पार्टनरशी खोटं बोलत नाहीत. जोडीदार, कुटुंब आणि नातेवाईकांशी तो व्यक्ती नेहमीच प्रामाणिक असतो. हातावर M रेषा असणारे लोक नेहमीच नात्यांमध्ये गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. याशिवाय M रेषा असणारे लोक ज्या क्षेत्रात जातात, तिथं ते यशाचा झेंडा रोवतात. त्यांना कधीही अपयश पाहायची सवय नसते. सेल्फ मोटिव्हेशन आणि आत्मविश्वासामुळं M रेषा असणारे लोक जगभरात वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होत असतात.
हातावर M रेषा असणाऱ्या लोकांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीही पैशांची कमतरता जाणवत नाही. कोणत्याही कामात किंवा अडचणींमधून ते सोप्या पद्धतीनं मार्ग काढतात. याशिवाय ते संपत्तीतून गरिबांना कोट्यवधी रुपयांचं दान देण्याचं काम करतात. स्वभाव आणि आकर्षक व्यक्तिमत्व असल्याने हातावर M रेषा असणाऱ्या लोकांचा नेहमीच प्रेमविवाह होत असतो.
लग्नानंतर ते बायकोशी अत्यंत प्रेमळ संबंध निर्माण करतात. तसेच या प्रकारच्या लोकांमध्ये जन्मजात नेतृत्वगुण ठासून भरलेला असतो. लोकांची कामं सोडवणं, इतरांच्या सुख-दुखात सामील होणं आणि लोकांचं नेतृत्व करण्यात त्यांचा हातखंडा असतो. त्यामुळं अनेक लोक बाळाच्या हातावर M रेषा निर्माण होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या