सप्ताहातील चंद्रभ्रमणात मंगळ, बुध आणि गुरूशी प्रतियोग होत असुन लक्ष्मीयोग, बुद्धादित्ययोग, आणि गजकेसरीयोग घटीत होत आहे. या शुभयोगाचा या राशींना होणार विशेष अर्थलाभ!
[ सिंह, वृश्चिक, कुंभ ]
सप्ताहात बुद्धादित्य योगात वृत्ती आनंदी राहील. वर्तमानकाळात वावरत असलात तरी काम करता करता तुमच्या डोक्यात सतत भविष्यकाळ राहील. आपणास मोठे आर्थिक लाभ घडविणारे योग आहेत. स्वतःला सिद्ध कराल. आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. लाभ स्थानातील चंद्रगोचर आणि शुभ योगात वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ मंडळी सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. खाजगी व व्यापारी नोकरीत भरभराट होईल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. विद्याभ्यासात प्रगती कराल. कलाक्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल. शुभवार्ता ऐकायला मिळतील. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. सुख मिळेल. नातेवाईकां कडून आर्थिक मदत मिळेल. घरात धार्मिक कार्य घडतील. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. प्रवासातुन धनप्राप्ती होईल. स्पर्धापरिक्षेत यश लाभेल. व्यवसायात नवीन प्रकल्प आरंभ कराल.
चंद्रबल शुभ तारीखः ०९, ११, १४, १५.
सप्ताहात लक्ष्मीयोगात कामात धडाडी दाखवाल. तटस्थ वृत्तीमुळे सर्वात वेगळे उठून दिसाल. नवनवीन गोष्टी करण्याकडे कल राहील. अनपेक्षीत आंनदाची बातमी मिळेल. आपल्या कार्य क्षेत्रात वाढ होईल. आयुष्यातील जोडीदाराकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहे. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. साहित्य कला क्षेत्रातील मंडळीना फारच चांगला फलदायी सप्ताह आहे. मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त वाढेल. कर्तुत्वात वाढ होईल. कार्यक्षेत्र विस्तारेल. व्यापारीवर्गाला आर्थिक फायदयाचा कालावधी आहे. आनंदी व ऊत्साही सप्ताह राहील. मनात प्रसन्नता असेल. आपणास कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जन मानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल.
चंद्रबल शुभ तारीखः १०, १२, १४, १५.
सप्ताहात गजकेसरीयोगात आर्थिक स्थिती चांगली राहील. त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. व्यवसायात फायदा मिळेल. एखादी महत्त्वाची आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर अवश्य करावी. आर्थिक लाभ चांगले होतील. व्यापारात आर्थिक उलाढालीतून आकस्मिक धनलाभ होणार आहेत. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक सप्ताह आहे. कुटुंबात मंगलकार्याची रूपरेखा आखली जाईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग निर्माण होत आहे. आर्थिक आवक उत्तम झाल्याने नवी खरेदी कराल. नव्या खरेदीने कुटुंबात आंनदी वातावरण राहिल. कर्ज प्रकरण मंजुर होतील. नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना विद्याभासात वाचनात गोडी निर्माण होईल. नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धीची प्रशंसा होईल.
चंद्रबल शुभ तारीखः ०९, ११, १३, १५.