Weekly lucky zodiac signs : या ३ राशीच्या लोकांसाठी सुवर्णलाभाचा सप्ताह, अक्षय्य लाभ होईल-weekly lucky zodiac signs from 6 to 12 may 2024 vrishabh kark meen rashi predictions ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Weekly lucky zodiac signs : या ३ राशीच्या लोकांसाठी सुवर्णलाभाचा सप्ताह, अक्षय्य लाभ होईल

Weekly lucky zodiac signs : या ३ राशीच्या लोकांसाठी सुवर्णलाभाचा सप्ताह, अक्षय्य लाभ होईल

May 06, 2024 12:57 PM IST

Weekly Lucky Rashi 6 to 12 May 2024 : एप्रिल महिन्याचा हा सप्ताह अक्षय्य तृतीयेचा खास सण व वैशाख मासारंभासह, कोण-कोणत्या राशींना फायदेशीर ठरेल? जाणून घ्या या आठवड्यातील लकी राशी कोणत्या आहेत.

आठवड्याच्या नशीबवान राशी, साप्ताहिक लकी राशीभविष्य
आठवड्याच्या नशीबवान राशी, साप्ताहिक लकी राशीभविष्य

सप्ताहात बुध राशीपरिवर्तनात दर्श अमावस्येनजिक 'या' राशींना होणारं आकस्मिक धनलाभ! पाहुयात कोणत्या आहेत त्या राशी!

[ वृषभ, कर्क, मीन ]

वृषभः 

सप्ताहात अनुकुल ग्रहयोगात आपल्याला विशेष लाभ होईल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश प्राप्त होईल. मित्रांच्या सहकार्यामुळे मनोधैर्य उंचावेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. नोकरीत मनासारखी बढ़ती व बदली होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. व्यापारात योजना गुप्तपणे पार पाडा. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. देण्याघेण्यात व्यवहारात नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसाहक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आपल्या कल्पना शक्तीच्या बळावर नवीन प्रकल्पात यश मिळेल. व्यवसाया निमित्त प्रवास होईल. प्रवासातून लाभ होतील. प्रशासकीय कामकाजासाठी शुभ योग आहेत. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश संपादन होईल. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहील. प्रवास सुखकर होईल. प्रवासातून आर्थिक लाभाची शक्यता आहे.

चंद्रबल शुभ तारीखः ०६, ०७, ११, १२.

कर्कः 

सप्ताहात ग्रहयोग अनुकुल आहेत. आपणास पुरस्कार आणि मानसन्मान प्राप्त होईल. आपले मनोबल व आत्मविश्वासात कमालीची वाढ दिसेल. राजकीय सामाजीक क्षेत्रातील कामाचे कौतुक होईल. भांवडा कडून उत्तम सहकार्य लाभेल. शासकिय क्षेत्रात व्यक्तींना पदप्रतिष्ठा मानसन्मान लाभेल. नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल. नवनवीन कल्पना आमलात आणाल. कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे. नोकरदारांना बढती मिळण्याचे योग आहेत. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. पैशाची आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदाराशी कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी असेल. सप्ताहात धनवान होण्याचे योग आहेत. आकस्मिकपणे धनलाभ होईल. सार्वजनिक कामची आवड राहील. परदेशात भ्रमणाचे योग आहेत. आरोग्य उत्तम राहील. ह्या शुभ योगात लाभ घ्या. लॉटरीमध्ये फायदा होईल. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. आंनदायक वातावरण राहिल.

चंद्रबल शुभ तारीखः ०७, ०९, ११, १२.

मीनः 

सप्ताहात ग्रहांचे योग पाहता मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहिल. व्यवसाय कला क्षेत्रातील व्यक्तींना स्वकर्तुत्व सिद्ध करण्यास वाव राहील. तुमची पदोन्नती आणि प्रगती होईल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. प्रगतीकारक काळ आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल. प्रेमप्रकरणात यश येईल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. व्यापार कारखानदार वर्गात व्यवसायात वाढ होईल. आपल्या कार्यक्षेत्रात कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल. आपल्या भूमिकेला वरिष्ठांकडून पसंती मिळेल. शासकीय कामकाजात यश येईल. राजाश्रय लोभल. राजदप्तरी मान सन्मान होईल. व्यवसाय रोजगारात उच्च ज्ञान किंवा नवे तंत्रज्ञान अंत्यत फायदेशीर ठरेल. महिला वर्गाना विशेष प्रगतीचा टप्पा गाठता येईल. अनुकूल परिस्थिती निर्माण करेल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल कराल. अनुकुल वातावरण असणार आहे.

चंद्रबल शुभ तारीखः ०६, ०८, ११, १२.

Whats_app_banner