मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Weekly lucky zodiac signs : या ३ राशींची लॉट्री लागेल, आठवडा आनंददायक व उत्साहाचा

Weekly lucky zodiac signs : या ३ राशींची लॉट्री लागेल, आठवडा आनंददायक व उत्साहाचा

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 05, 2024 09:25 AM IST

Weekly Lucky Rashi 5 to 11 february 2024 : फेब्रुवारी महिन्याचा हा सप्ताह कोणत्या राशींची लॉट्री लागेल, जाणून घ्या या आठवड्याच्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.

weekly lucky zodiac signs from 5 to 11 february 2024
weekly lucky zodiac signs from 5 to 11 february 2024

सप्ताहाच्या मंगळ आणि शुक्र या लक्ष्मीकारक ग्रहाचं राशीपरिवर्तन आणि दर्श अमावस्येनजिक 'या' राशींसाठी ग्रहमान विशेष अनुकुल राहतील! कार्यक्षेत्रात मिळणार बक्कळ लाभ!

वृषभः 

सप्ताहात सहा ग्रहांशी होणाऱ्या युतीयोगात आपले मनोबल व आत्मविश्वासात कमालीची वाढ दिसेल. राजकीय सामाजीक क्षेत्रातील कामाचे कौतुक होईल. भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. शासकिय क्षेत्रातील व्यक्तींना पदप्रतिष्ठा मानसन्मान लाभेल. नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल.नवनवीन कल्पना आमलात आणाल. कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे. नोकरदारांना बढती मिळण्याचे योग आहेत. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. पैशाची आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदाराशी कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. धनवान होण्याचे योग आहेत. आकस्मिकपणे धनलाभ होईल. सार्वजनिक कामची आवड राहील. परदेशात भ्रमणाचे योग आहेत. आरोग्य उत्तम राहील. सप्ताहात शुभ योग आहे. लॉटरीमध्ये फायदा होईल. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. आंनदायक वातावरण राहील.

चंद्रबल शुभ तारीखः ०५, ०७, ०९, ११.

कन्याः 

सप्ताहातील ग्रहयोग अनुकूल असल्याने उद्योग व्यापारात आणि नोकरीत मोठे यश प्राप्त होईल. मित्रांच्या सहकार्यामुळे मनोधैर्य उंचावेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. नोकरीत मनासारखी बढती व बदली होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. व्यापारात योजना गुप्तपणे पार पाडा. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. देण्याघेण्यात व्यवहारात नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसा हक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. प्रवासातून लाभ होतील. शासकीय कामकाजासाठी शुभ योग आहेत. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश संपादन होईल. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहील. प्रवास सुखकर होईल. प्रवासातून आर्थिक लाभाची शक्यता आहे.

चंद्रबल शुभ तारीखः ०६, ०७, १०, ११.

मकरः 

सप्ताहात चंद्रगोचर अनुकूल असल्याने अनपेक्षीत आंनदाची बातमी मिळेल. आपल्या कार्य क्षेत्रात वाढ होईल. आयुष्यातील जोडीदाराकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहे. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. साहित्य कला क्षेत्रातील मंडळीना फारच चांगला फलदायी सप्ताह आहे. मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त वाढेल. कर्तुत्वात वाढ होईल. कार्यक्षेत्र विस्तारेल. व्यापारीवर्गाला आर्थिक फायद्याचा कालावधी आहे. आनंदी व ऊत्साही सप्ताह राहील. मनात प्रसन्नता असेल. आपणास कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी राहील. विद्याभ्यासात प्रगती राहील.

चंद्रबल शुभ तारीखः ०५, ०७, ०८, १०.