Weekly Lucky Zodiac Signs : लक्ष्मीयोगात मिळेल बक्कळ लाभ! या ३ राशीच्या लोकांसाठी आठवडा ठरेल लकी
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Weekly Lucky Zodiac Signs : लक्ष्मीयोगात मिळेल बक्कळ लाभ! या ३ राशीच्या लोकांसाठी आठवडा ठरेल लकी

Weekly Lucky Zodiac Signs : लक्ष्मीयोगात मिळेल बक्कळ लाभ! या ३ राशीच्या लोकांसाठी आठवडा ठरेल लकी

Published Jul 29, 2024 08:02 AM IST

Weekly Lucky Rashi 29 july to 4 august 2024 : ग्रह नक्षत्राच्या योग संयोगात ३ राशीच्या व्यक्तिंना आठवडा आकस्मिक बक्कळ लाभाचा राहील, या राशीच्या लोकांना सुख मिळेल. या आहेत आठवड्याच्या लकी राशी.

साप्ताहिक लकी राशीभविष्य, आठवड्याच्या नशीबवान राशी
साप्ताहिक लकी राशीभविष्य, आठवड्याच्या नशीबवान राशी

सप्ताहात ऐश्वर्यदायी शुक्राचं राशीपरिवर्तन आणि लक्ष्मीयोग व गजकेसरीयोग या राशींसाठी विशेष लाभदायक ठरणार!

[ मिथुन, सिंह, मकर ]

मिथुनः 

सप्ताहात शुक्राचं राशीपरिवर्तनात पाहता आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग मिळतील. कलाकारांना प्रसिद्धीचा काळ उत्तम आहे. प्रवासातून आपणास योग्य दिशा मिळेल. आर्थिक बचत आपण उत्तम प्रकारे करु शकाल. आपल्या समस्येपेक्षा दुसऱ्याचे कष्ट कमी करण्यासाठी आपण नेहमी तत्पर रहाल. आपण इच्छित असलेल्या कामात यश मिळेल. संशोधन क्षेत्रातील व्यक्तींना स्वकर्तुत्व सिद्ध करण्यास वाव राहील. तुमची पदोन्नती आणि प्रगती होईल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. प्रगतीकारक काळ आहे. प्रेमप्रकरणात यश येईल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. व्यापार कारखानदार वर्गात व्यवसायात वाढ होईल. आपल्या कार्यक्षेत्रात कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल. आपल्या भूमिकेला वरिष्ठांकडून पसंती मिळेल. शासकीय कामकाजात यश येईल. राजदप्तरी मान सन्मान होईल. व्यवसाय रोजगारात उच्च ज्ञान किंवा नवे तंत्रज्ञान अंत्यत फायदेशीर ठरेल. महिला वर्गाना विशेष प्रगतीचा टप्पा गाठता येईल.

चंद्रबल शुभ तारीखः २९, ३१, ०१, ०४.

सिंहः 

सप्ताहात शुक्र राशीपरिवर्तन करीत आपल्या राशीत प्रवेश करतोय. प्रगतीचे नवे मार्ग आपणास ग्रहमान देणार आहे. लांबचे प्रवास आनंददायक होतील. समाजासाठी आपण करत असलेल्या कामासाठी आपल्याला प्रसिद्धी मिळेल. या शुभ योगात वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. खाजगी व व्यापारी नोकरीत भरभराट होईल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. विद्याभ्यासात प्रगती कराल. कलाक्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल. शुभवार्ता ऐकायला मिळतील. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. सुख मिळेल. नातेवाईकां कडून आर्थिक मदत मिळेल. मोठया अधिकाराची नोकरी मिळेल. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. अचानक लाभ होण्याची शक्यता असून वारसा हकाचे प्रकरण मार्गी लागेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीं सोबत परिचय होईल. चांगल्या विचारांचा लाभ होईल. मानसन्मान वाढीस लागेल.

चंद्रबल शुभ तारीखः २९, ३०, ०१, ०३.

मकरः 

सप्ताहात लक्ष्मीयोगात प्रगतीचा आलेख उंचावलेला असेल. नोकरदारांसाठी ग्रहमान साथ देणारे ठरतील. लेखक वर्गास त्याच्या उत्कृष्ठ लेखन शैलीमुळे आर्थिक आवक उत्तम येईल. व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. घरासंबंधी समस्या सुटतील. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. मागील कामात विशेष यश मिळेल. मनोधैर्य वाढेल. वैवाहिक जीवन व कंटुबातील स्थिती चांगली राहिल. आपल्या इच्छित महत्वकांक्षे नुसार सर्व कामे पार पडतील. उताविळपणा करू नये. संयम ठेवून वाटचाल करावी. साहसी वृत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. व्यापार रोजगारात नवीन संधी येऊ शकते. शुभकार्यात सहभाग घ्याल. यश व उत्साह वाढणार आहे. संकुचित मनोवृत्ती टाळा. विद्यार्थ्यी विद्याभ्यासात प्रगती करतील. कुटुंबातील वातावरण स्नेहपूर्वक राहिल. कुटंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीकडे लक्ष दयावे. अचानक लाभ होतील. प्रवास लाभकारी ठरतील. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.

चंद्रबल शुभ तारीखः ३१, ०१, ०३, ०४.

Whats_app_banner