मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Weekly lucky zodiac signs : या ३ राशीच्या लोकांना आठवडा आर्थिक भरभराटीचा, कष्टाचे चीज होईल

Weekly lucky zodiac signs : या ३ राशीच्या लोकांना आठवडा आर्थिक भरभराटीचा, कष्टाचे चीज होईल

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 29, 2024 08:58 AM IST

Weekly Lucky Rashi 29 April to 5 May 2024 : एप्रिल व मे महिन्याचा हा आठवडा कोण-कोणत्या राशींसाठी लाभाचा आणि भरभराटीचा राहील, जाणून घ्या या सप्ताहातील नशीबवान राशी कोणत्या आहेत.

आठवड्याच्या नशीबवान राशी, साप्ताहीक लकी राशीभविष्य
आठवड्याच्या नशीबवान राशी, साप्ताहीक लकी राशीभविष्य

एप्रिल अखेर आणि मे महिन्याची सुरवात काही राशींना भाग्यदायक ठरेल. सप्ताहात गुरू राशीपरिवर्तनात 'या' राशींची होणार आर्थिक भरभभराट ! जाणून घ्या या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

[ सिंह, तूळ, धनु ]

सिंहः 

सप्ताहात उत्तम ग्रहयोग लाभल्याने आपण आपल्या शब्दाने लोकावर हुकुमत गाजवाल. भाग्य वृद्धीचा योग येईल. कौटुंबिक सुख उत्तम मिळेल. स्वप्रयत्नाने धन मिळवाल. नोकरीत असाल तर अधिकार योग प्राप्त होईल. दाग-दागिन्यांचा संग्रह बऱ्यापैकी होईल. हातात नेहमी पैसा खेळत राहील. ओळखीच्या लोकांपासून फायदा होईल. कलाकारांना योग्य ती संधी आपणास मोठे आर्थिक लाभ घडविणारे योग आहेत. स्वतःला सिद्ध कराल. आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. शुभ योगात वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबा तील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. खाजगी व व्यापारी नोकरीत भरभराट होईल. सार्वजनिक कामात आपला नाव लौकिक वाढेल. विवाह इच्छुकांचे खात्रीशीर विवाहाचे योग आहेत. कलाक्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल.

चंद्रबल शुभ तारीखः ३०, ०२, ०४, ०५.

तूळ: 

सप्ताह रवि-मंगळ-बुध युतीत नवीन घर घेण्याचे योग आहेत. आपण कुटुंबावर प्रेम कराल. मातृभक्त व्हाल. राजकारणात असाल तर जनतेकडून मान मिळेल. चांदी हिरे यांचा व्यापार करत असाल तर उत्तम अर्थाजन कराल. संपत्तीचा हव्यास राहील. वारसा हक्काने स्थावर इस्टेटीचा लाभ होईल. नोकरीत आपले प्रयत्न यशस्वी होतील. व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. घरासंबंधी समस्या सुटतील. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. मागील कामात विशेष यश मिळेल. मनोधैर्य वाढेल. वैवाहिक जीवन व कंटुबातील स्थिती चांगली राहिल. आपल्या इच्छित महत्वकांक्षेनुसार सर्व कामे पार पडतील. उताविळपणा करू नये. संयम ठेवून वाटचाल करावी. साहसी वृत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. अतिआत्मविश्वासाने निर्णय घेऊ नका. व्यापार रोजगारात नवीन संधी येऊ शकते. शुभकार्यात सहभाग घ्याल. यश व उत्साह वाढणार आहे. संकुचित मनोवृत्ती टाळा. कुटुंबातील वातावरण स्नेहपूर्वक राहिल.

चंद्रबल शुभ तारीखः २९, ०१, ०३, ०५.

धनुः 

सप्ताहात शुक्र-चंद्र शुभ संयोगात लेखन गायन, वादन यांची आवड निर्माण होईल. खेळाडूंना योग्य संधी चालून येईल. नोकरी मध्ये सल्लागार पदी नियुक्ती होईल. आपल्या बुद्धीमत्तेपुढे दुसरे लोक चकीत होऊन जातील. वादविवादात सामर्थ्य मिळेल. वैभव प्राप्त होईल. सद्गुरूकृपा व पुण्याईने आपला भाग्योदय होईल. आपली पदोन्नती आणि प्रगती होईल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. प्रगतीकारक काळ आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. व्यापार कारखानदार वर्गात व्यवसायात वाढ होईल. अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल कराल. अनुकुल वातावरण असणार आहे. आपण केलेल्या कष्टाचे चीज होईल. अचानक आर्थिक लाभ मिळेल. व्यवसायिकांना योजना पद्धतीने केलेल्या कामामुळे आर्थिक दृष्ट्या उन्नती होईल. सार्वजनिक कामात मोठमोठ्या समारंभात भाग घ्याल.

चंद्रबल शुभ तारीखः ३०, ०२, ०३, ०५.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)

Akshay Tritiya : अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? ही तिथी इतकी शुभ का मानली जाते? जाणून घ्या

WhatsApp channel