मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Weekly lucky zodiac signs : रोजगारात नवीन संधी आणि यश! पाहा मे महिन्याचा शेवटचा आठवडा कोणासाठी ठरेल लकी?

Weekly lucky zodiac signs : रोजगारात नवीन संधी आणि यश! पाहा मे महिन्याचा शेवटचा आठवडा कोणासाठी ठरेल लकी?

May 27, 2024 10:19 AM IST

Weekly Lucky Rashi 27 May to 2 June 2024 : मे महिन्याचा शेवटचा आठवडा कोणत्या ३ राशींसाठी लकी ठरेल, जाणून घ्या या साप्ताहिक लकी राशीभविष्य.

आठवड्याच्या नशीबवान राशी
आठवड्याच्या नशीबवान राशी

सप्ताहात घटीत होणारा विपरीत ग्रहणयोग व विषयोग आणि अस्त गुरूचा होणारा उदय पाहता या राशींना मिळणार रोजगारात नवीन संधी आणि यश!

[ मिथुन, सिंह, मीन ]

मिथुनः 

सप्ताहात व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. घरासंबंधी समस्या सुटतील. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहिल. मनोबल कमालीचे उंचावलेल असेल. प्रशासकीय सेवेतील व्यक्तींना स्वकर्तुत्व सिद्ध करण्यास वाव राहील. तुमची पदोन्नती आणि प्रगती होईल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. व्यापारीवर्गात आनंदी वातावरण राहिल. व्यवसायात वाढ होईल. आपल्या कार्यक्षेत्रात कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल. व्यवसाय रोजगारात उच्च ज्ञान किंवा नवे तंत्रज्ञान अंत्यत फायदेशीर ठरेल. नवीन उपक्रम राबविण्यात उत्सुक राहाल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल कराल. अनुकुल वातावरण असणार आहे. नवीन वस्तु खरेदीचा योग आहे.

चंद्रबल शुभ तारीखः २७, २९, ०१, ०२.

सिंहः 

सप्ताहात व्यापारात योजना गुप्तपणे पार पाडा. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. व्यवहारात नोकरीत आपल्या नियोजनात्मक कार्यात आपल्या कौशल्याची प्रशंसा होईल. वारसाहक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. व्यापारात प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. प्रवासातून लाभ होतील. शासकीय कामकाजासाठी शुभ योग आहेत. नोकरी करिता इच्छुकवर्गास परिक्षेत व मुलाखतीत यश संपादन होईल. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहिल. प्रवास सुखकर होईल. प्रवासातून आर्थिक लाभाची शक्यता आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य मिळेल. यश व उत्साह वाढणार आहे. संकुचित मनोवृत्ती टाळा. कुटुंबातील वातावरण स्नेहपूर्वक राहिल. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. घर खरेदी होईल. व्यापारात नवीन प्रस्ताव मिळतील.

चंद्रबल शुभ तारीखः २८, ३०, ३१, ०२.

मीनः 

सप्ताहात आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. त्यातून मोठे आर्थिक लाभ घडविणारे योग आहेत. बांधकाम क्षेत्र अथवा जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. खाजगी व व्यापारी नोकरीत भरभराट होईल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या भेटी घडतील. कार्यपद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यास अनपेक्षीत लाभ होतील. दैवी पाठबळ लाभणार आहे. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. वैवाहिक जीवन व कंटुबातील स्थिती चांगली राहिल. आपल्या महत्वकांक्षेनुसार सर्व कामे पार पडतील. मित्र मैत्रिणींकडून लाभ होतील. विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगती होईल. नवीन व्यापारास आरंभ कराल. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. शुभकार्यात सहभाग घ्याल. अचानक लाभ होतील. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसाया निमित्त प्रवास होईल. व्यापार रोजगारात नवीन संधी येऊ शकते.

चंद्रबल शुभ तारीखः २७, २९, ३०, ०१.

WhatsApp channel